अतिवृष्टी, पीकविम्यासाठी शेतकऱ्यांनी अडवला राज्यमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST2021-07-29T04:22:00+5:302021-07-29T04:22:00+5:30

तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या आदेशान्वये कामगार तलाठी बाबासाहेब अंधारे यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ...

Excessive rains, farmers blocked state highways for crop insurance | अतिवृष्टी, पीकविम्यासाठी शेतकऱ्यांनी अडवला राज्यमार्ग

अतिवृष्टी, पीकविम्यासाठी शेतकऱ्यांनी अडवला राज्यमार्ग

तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या आदेशान्वये कामगार तलाठी बाबासाहेब अंधारे यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश भोसले, भाजपा तालुका सरचिटणीस रामजी केसभट, माजी सरपंच रामजी अंधारे, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव घोरतळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ कुढेकर, विठ्ठल तांबे, सामाजिक कार्यकर्ते बाबा पठाण यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी नवनाथ खोले, एकनाथ घोरतळे, बाळासाहेब घोरतळे, हनुमान गावंढे, पंडित घोरतळे, कचरु गर्जे आदी उपस्थित होते.

बोधेगाव व हातगाव परिसरातील सुमारे दोनशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे सन २०२० - २१मधील खरीप हंगामातील पीक विमा आणि अतिवृष्टीचे अनुदान अद्याप मिळाले नाही. शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली. मात्र, विचार झाला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी हे आंदोलन केले. तहसीलदारांचे प्रतिनिधी बाबासाहेब अंधारे यांनी आंदोलकांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या याद्या तपासून ही नावे अनुदानासंदर्भात जिल्हाधिकारी यांना कळवून वाढीव अनुदान मागणी करण्यात येईल. तसेच खरीप पीकविमा संबंधी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित विमा कंपनीशी पत्रव्यवहार करून खरीप पीक विमा लवकर मिळून देण्याकरिता कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस नाईक, नेताजी मरकड, बंटी काळोखे, राजू ढाकणे, उमेश गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

------------

फोटो - २८शेवगाव रास्ता रोको

शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील शेतकऱ्यांनी अतिवृष्टी आणि पीक विम्याची रक्कम मिळण्याबाबत तहसीलदार कार्यालय प्रतिनिधींना निवेदन दिले.

Web Title: Excessive rains, farmers blocked state highways for crop insurance