शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिस, बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST

म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश झगडे तर बालरोग टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ. विकास शिंदे यांची निवड करण्यात ...

म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश झगडे तर बालरोग टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ. विकास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

तालुक्यात संभाव्य म्युकरमायकोसिस व कोरोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणार्‍या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा विशेष कार्यदल (टास्क फोर्स) तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी स्थापन केला आहे. यामध्ये ११ तज्ज्ञ खाजगी डॉक्टर सदस्य असून वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी सदस्य सचिव असणार आहेत.

जामखेड तालुक्यात म्युकरमायकाेसिसचे रुग्ण अद्याप नसून, संभावित म्युकरमायकोसिस व तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे यावर नियंत्रण, निदान, उपचार व मार्गदर्शन करण्यासाठी हा टाक्स फोर्स स्थापन करण्यात आला आहे.

म्युकरमायकोसिस टास्क फोर्स अध्यक्ष म्हणून नेत्रतज्ज्ञ डॉ. गणेश झगडे, तर सदस्यपदी डॉ. अविनाश मुंडे, डॉ. रोहन टोमके, डॉ. सूरज तौर, डॉ. आनंद लोंढे, डॉ. राजकुमार गायकवाड, डॉ. सागर शिंदे, सचिव म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांची निवड करण्यात आली आहे. बालरोग टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. विकास शिंदे, तर सदस्य म्हणून डॉ. प्रताप चौरे, डॉ. सुहास सूर्यवंशी, डॉ. महेश गोडगे, सचिव म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे हे असणार आहेत.