शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी संकुलाभोवतीच अतिक्रमण

By admin | Updated: January 14, 2016 23:03 IST

शिर्डी : साई मंदिरालगत असलेल्या साई कॉम्प्लेक्सला अतिक्रमणांच्या पडलेल्या विळख्याने त्रस्त झालेल्या व्यावसायिकांनी गुरूवारी आपले व्यवसाय बंद करून नगरपंचायतमध्ये येऊन आपले गाऱ्हाणे मांडले़

शिर्डी : साई मंदिरालगत असलेल्या साई कॉम्प्लेक्सला अतिक्रमणांच्या पडलेल्या विळख्याने त्रस्त झालेल्या व्यावसायिकांनी गुरूवारी आपले व्यवसाय बंद करून नगरपंचायतमध्ये येऊन आपले गाऱ्हाणे मांडले़साई मंदिरालगत साई कॉम्प्लेक्स हे नगरपंचायतचे व्यापारी संकुल आहे़या संकुलात जवळपास अडीचशे व्यावसायिक आहेत़ या संकुलाची रचना गुंतागुतीचे आहे.त्यातच नगरपंचायतचे अव्वाच्या सव्वा भाडे व अन्य करांमुळे अनेकांनी व्यवसायच बंद केले आहेत़ या संकुलाला गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणांचा विळखा पडलेला आहे़ या अतिक्रमणधारकांनी संस्थानच्या जागेत त्यांच्या स्टॉलच्या समोर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केले़ नगरपंचायतचा अतिक्रमणविरोधी विभागही तसेच संस्थानचा सुरक्षा विभागही या अतिक्रमणाकडे डोळेझाक करत होता़ त्या पार्श्वभूमीवर त्रस्त झालेल्या व्यावसायिकांनी गुरूवार असूनही आपले व्यवसाय बंद केले व नगरपंचायतच्या सत्ताधारी गटाचे नेते व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला़ दरम्यान मुख्य लिपीक एम़बी़देसले व कार्यालयीन अधीक्षक ताकपिरे यांनी तातडीने अतिक्रमण पथकास पाचारण करून ही अतिक्रमणे काढण्याचे व यापुढे अतिक्रमणे होऊ नये याकरता कठोर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने व्यावसायिकांनी पुन्हा आपली दुकाने उघडली़