शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात निवडणूक यंत्रणा सज्ज, खासगी बसेसचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST

श्रीगोंदा : तालुक्यात ५८ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. ५०० जागांसाठी १ हजार ०९७ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे सव्वा ...

श्रीगोंदा : तालुक्यात ५८ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. ५०० जागांसाठी १ हजार ०९७ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे सव्वा लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेची प्रशासनाने तयारी केली आहे. यंदा प्रथमच मतपेट्या, निवडणूक कर्मचाऱ्यांना पाठविण्यासाठी खासगी बसेसचा वापर केला जाणार आहे.

५८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २२१ मतदान केंद्र आहेत. यामध्ये सात मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी १ हजार ३४४ अधिकारी पोलीस कर्मचारी, होमगार्ड सज्ज आहेत. या निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक निरीक्षक रवींद्र परदेशी श्रीगोंद्यात दाखल झाले आहेत.

तहसीलदार प्रदीप पवार, अप्पर तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, सायली नांदे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, अरविंद माने, गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद व त्यांची टीम नियोजनात व्यस्त आहे.

मतदान प्रक्रियेत प्रथमच ३५ खाजगी बसेसचा वापर करण्यात आला आहे. जादा भाड्याच्या नावाखाली ज्या परिवहन महामंडळाच्या लाल परीला नाकारण्यात आले आहे. कोरोनामुळे लाल परी अडचणीत आहे. निवडणुकीसाठी तरी तिचा वापर होणे अपेक्षित होते.

----

ग्रामपंचायत निवडणुकीच्या खर्चासाठी निधी कमी आहे. परिवहन महामंडळाच्या बसेसला जादा भाडे द्यावे लागते. तेवढा निधी आमच्याकडे नाही. कमी पैशात खासगी बसेस उपलब्ध झाल्या आहेत. जादा निधी असता तर परिवहन महामंडळाच्या बसेस वापरता आल्या असत्या.

- प्रदीप पवार,

तहसीलदार, श्रीगोंदा