घारगाव, बोटा परिसरात भूकंपाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:21 IST2021-03-26T04:21:02+5:302021-03-26T04:21:02+5:30

संगमनेर तालुक्यातील पठार भागात जाणवलेला भूकंपाचा धक्का सौम्य असल्याचे संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले. घारगाव व बोटा या ...

Earthquake shakes Ghargaon, Bota area | घारगाव, बोटा परिसरात भूकंपाचा धक्का

घारगाव, बोटा परिसरात भूकंपाचा धक्का

संगमनेर तालुक्यातील पठार भागात जाणवलेला भूकंपाचा धक्का सौम्य असल्याचे संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले. घारगाव व बोटा या दोन प्रमुख गावांसह म्हसवंडी, बोरबन, माळवाडी, आंबी, कुरकुटवाडी, बोरबन, अकलापूर, एलखोप, केळेवाडी, मुंजेवाडी, आभाळवाडी या गावांमध्येही धक्का बसल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वीही पठार भागातील काही गावांमध्ये सौम्य धक्के बसले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. अनेक ग्रामस्थांनी तशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धक्का बसायला सुरुवात झाल्यानंतर ग्रामस्थ घराबाहेर पळत सुटले. ऑगस्ट २०१८ मध्ये असे भूकंपाचे धक्के जाणवले होते.

---------

संगमनेर तालुक्यातील पठार भागात यापूर्वीही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिकच्या ‘मेरी’ या संस्थेकडून याबाबत संशोधन सुरू आहे. ग्रामस्थांनी मोडकळीस आलेल्या घरांमध्ये वास्तव्य करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये.

-डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी संगमनेर, उपविभाग, संगमनेर

Web Title: Earthquake shakes Ghargaon, Bota area