शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

‘महिलाराज’ संपुष्टात!

By admin | Updated: July 29, 2014 01:04 IST

अहमदनगर: गेल्या तीन खेपांपासून नगर पंचायत समितीत सुरु असलेले ‘महिलाराज’ आजच्या सोडतीमुळे संपुष्टात आल्यात जमा आहे.

अहमदनगर: गेल्या तीन खेपांपासून नगर पंचायत समितीत सुरु असलेले ‘महिलाराज’ आजच्या सोडतीमुळे संपुष्टात आल्यात जमा आहे. यावेळी नागरिकांचा मागासप्रवर्ग सभापतीपदासाठी आरक्षित झाल्याने साडेसात वर्षांच्या अवधीनंतर नगरच्या सभापतीपदाची माळ एखाद्या पुरुष सदस्याच्या गळ्यात पडण्याच्या आशा पल्लवित झाल्याने आजची सोडत पुरुष सदस्यांसाठी ‘गुडन्यूज’ ठरल्याची चर्चा आहे.नगर पंचायत समितीत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. यात सेनेचे ४, भाजपचे ३, काँग्रेसचे ३ व राष्ट्रवादीच्या २ सदस्यांचा समावेश आहे. सध्या अस्तित्वात असलेले सभापतीपदाचे आरक्षण (अनुसूचित जाती महिला) ४ पक्षांपैकी केवळ सेनेकडेच होते. यामुळे सेनेच्या सुनीता नेटके सभापती तर भाजपचे शरद झोडगे उपसभापती झाले होते. नगर पंचायत समितीत गेल्या साडेसात वर्षांपासून सभापतीपदावर ‘महिलाराज’चेच राज्य होते. मात्र, काहींची कारकीर्द वादग्रस्त ठरली. राज्यभर नगर पंचायत समितीच्या कारभाराची बोंबाबोंब झाली. यामुळे पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी तसेच कामे घेऊन येणारे नागरिकही ‘महिलाराज’वर नाराज होते. यावेळी ओबीसी पुरुष असे सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर झाल्याने सत्ताधारी युतीच्या गटातील पुरुष सदस्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सभापतीपदासाठी शिवसेना-भाजपमध्ये अडीच-अडीच वर्षे असे कुठेलच समीकरण ठरले नसल्याचे शिवसेनेच्यावतीने अधिकृतपणे सांगण्यात आले. यामुळे यावेळीही सेनेचाही सभापतीपदावर दावा कायम असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नगर तालुक्यात युती व राष्ट्रवादीचे सूर ‘बेसूर’ झाल्याने युतीची नेतेमंडळी काँग्रेसबरोबर ‘सूर’ जुळवून घेऊन त्यांच्या तीनही महिला सदस्यांना सत्तेत सामावून घेण्याच्या हालचालीत आहेत. राष्ट्रवादीला बाजूला सारत ही युती होण्याची चर्चा कार्यकर्ते करीत आहेत. सभापती सेनेचा की भाजपचा याचा निर्णय आ. शिवाजी कर्डिले व सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हेच घेणार असल्याने सेनेकडून व भाजपकडून वेगवेगळ्या ‘पुरुष’ सदस्यांचा आग्रह कार्यकर्ते धरत आहेत. नगर तालुक्यात नंदा शेंडगे, नलिनी पाखरे, सुनीता नेटके या तिनही महिला एकामागून एक झाल्या. यामुळे काहींचा कारभार यजमानांनी तर काहींचा कुटुंबीयांनी सांभाळला. विकासकामांत अडथळे येऊ लागल्यानंतर आता ‘कणखर’ नेतृत्व असलेला सभापती हवा, असा आग्रह सुरू झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)