शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बंधारे फुटल्याने शेतीचे नुकसान

By admin | Updated: June 24, 2016 01:22 IST

शेवगाव : शेवगावसह तालुक्यातील बोधेगाव, चापडगाव वगळता तालुक्याच्या बहुसंख्य भागात बुधवारी रात्री दमदार पाऊस झाला.

शेवगाव : शेवगावसह तालुक्यातील बोधेगाव, चापडगाव वगळता तालुक्याच्या बहुसंख्य भागात बुधवारी रात्री दमदार पाऊस झाला. दरम्यान, नानी नदीवरील खरडगाव येथील मोऱ्या कोंडल्यामुळे बंधारे दोन्ही बाजूने फुटल्याने परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले. गेल्या काही वर्षात जून महिन्यात तालुक्यात पाऊस झाला. गेल्या दोन दिवसापासून तालुक्याच्या बहुतेक भागात पाऊस झाल्याने खरीप पेरण्यासाठी खते व बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. बुधवारच्या पावसामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या ढोरा, नंदीनी नद्यांना चांगले पाणी वाहिले, अनेक बंधारे, ओढे नाल्यांना पाणी आल्याने ग्रामस्थांनी जलपूजन करून जल्लोष केला. गेल्या चार वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या व यंदाच्या वर्षी १९७२ च्या मोठ्या दुष्काळाच्या संकटापेक्षाही पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व पाणी टंचाईच्या भीषणतेचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची आस लागली होती. तालुक्यातील ५७ गावे व २३५ वाड्यावस्त्यांना ६८ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता. त्यात जनावरांसाठी ४५ स्वतंत्र खेपा सुरू होत्या. तालुक्यात पावसाला सुरुवात झाल्याने जनावरांच्या ४५ खेपा बुधवारपासून बंद करण्यात आल्या आहेत.