शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

नोटीस मिळताच दारूमुळे रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचा दावा मागे; डॉक्टर आला ताळ्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 08:45 IST

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांनी आपण देशी दारूची मात्रा देऊन कोरोना रुग्ण बरे केल्याचा दावा केला होता. पन्नासहून अधिक रुग्णांना आपण दररोज तीस मिलीलिटर देशी दारू दिली.

अनिल साठे - शेवगाव (अहमदनगर) : देशी दारूचा काढा घेतल्याने कोरोनाचे रुग्ण बरे होतात या दाव्यापासून संबंधित डॉक्टरने तीनच दिवसात घूमजाव केले आहे. ‘कुणीही या पद्धतीने उपचार करू नये. त्यातून काही उद्भवल्यास आपण जबाबदार राहणार नाही’, असा पवित्रा प्रशासनाच्या नोटीसीनंतर आता या डॉक्टरने घेतला आहे.शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांनी आपण देशी दारूची मात्रा देऊन कोरोना रुग्ण बरे केल्याचा दावा केला होता. पन्नासहून अधिक रुग्णांना आपण दररोज तीस मिलीलिटर देशी दारू दिली. ही ठराविक मात्रा दिल्यानंतर रुग्ण बरे झाल्याचे आढळले, असे कथन त्यांनी सोशल मीडियावर केले होते.‘लोकमत’ने प्रशासनाचे या दाव्याकडे लक्ष वेधल्यानंतर शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी डॉ. भिसे यांना खुलासा विचारला होता. तहसीलदार अर्चना पागिरे यांनीही त्यांना समक्ष उपस्थित राहून खुलासा करण्यास बोलविले होते. प्रशासनाकडून पत्रव्यवहार सुरू होताच भिसे यांनी आपला दावा मागे घेतला आहे. प्रशासनाकडून आलेल्या नोटीसला त्यांनी बुधवारी सायंकाळी उत्तर दिले आहे.व्हिडिओच पाहिला नाहीनगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा म्हणाले, डॉ. भिसे यांनी काय दावा केला ते मला माहीत नाही. मी हा व्हिडिओच पाहिला नाही. काय दावा आहे तो व्हिडिओ मला पाठवा. 

सर्वांना सांगू इच्छितो की, मी माझ्या पोस्टमध्ये...डॉक्टर म्हणाले मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी माझ्या पोस्टमध्ये फक्त आणि फक्त देशी दारूने कोरोना बरा होतो असा कोणताही दावा केलेला नाही. मी रुग्णांना शासनमान्य ॲलोपॅथिक औषधे पण दिली होती. कोरोनावर दारूचा उपचार करण्यास शासनाने अगर तज्ज्ञांनी मान्यता दिलेली नाही. त्यामुळे कोणीही कोरोना रुग्णाला दारू देऊ नये. माझ्या पोस्टचा गैरअर्थ काढून कोणी अपप्रचार करून व्यसनाचे किंवा दारूचे समर्थन करू नये.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर