शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक अधिकाऱ्यांना पिटाळले

By admin | Updated: September 2, 2014 23:44 IST

राहुरी : जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना ठिय्या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पिटाळून लावले़

राहुरी : राहुरी येथील डॉ़ बा़ बा. तनपुरे साखर कारखान्याचा ताबा घेण्यासाठी आलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना ठिय्या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पिटाळून लावले़ अधिकाऱ्यांवर वाळूफेक करीत धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी घोषणा देत आल्या पावलांनी मागे जा, असा इशारा दिल्याने गेटमधून कारखान्याच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या वसुली पथकाला कर्मचाऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले़मंगळवारी जिल्हा बँकेचे अधिकारी कारखान्याचा ताबा घेण्यासाठी येणार असल्याने कर्मचाऱ्यांनी कारखान्याच्या मुख्य कार्यालयासह गेस्ट हाऊसला कुलूप लावले होते़ जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी एस़ डी़ वाघमारे हे कारखान्याचा ताबा घेण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ आले़ त्यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष दादासाहेब इंगळे यांचे भाषण सुरू होते़ संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना मागे फिरा, असे सांगत घोषणा देण्यास सुरूवात केली. कारखान्याची ५०० कोटी रूपयांची मालमत्ता असताना बँकेने ३९ कोटी रूपये दाखविली़ मग बँकेने ४० कोटी रूपये कर्ज दिलेच कसे? असा सवाल माजी संचालक बाळासाहेब चव्हाण यांनी करून फेरमूल्यांकन करण्याचे आवाहन केले़ वाघमारे म्हणाले की, ११ महिन्यांपूर्वी कारखान्याला कर्जासंदर्भात नोटीस दिली होती़ कार्यकारी संचालकांकडून आम्ही कायदेशीर ताबा घेणार आहोत. अहवालानुसार व्हॅल्युएशन करण्यात आले असून पुन्हा व्हॅल्युएशन करण्यात येईल, असे वाघमारे यांनी स्पष्ट करीत कारखान्याच्या कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली़ त्याचवेळी संतप्त कामगारांनी त्यांना लोटीत प्रवेशव्दारापासून दूर नेले़ त्यावेळी एकाने वाळूही फेकली़ त्यामुळे विना पोलीस संरक्षण आलेल्या पथकाने पळ काढला़ आंदोलन संपल्यानंतर विरोधी संचालक शिवाजीराव गाडे यांनी कामगारांची भेट घेतली़ कर्मचाऱ्यांसमोर अप्पासाहेब गावडे, सुरेश थोरात, राणू सरोदे, भाऊसाहेब पगारे, राजेंद्र बोरूडे, राजेंद्र लोंढे, अशोक नगरे, चंद्रकांत कराळे आदींची भाषणे झाली़ पथकात बाळासाहेब भोसले, अण्णासाहेब पाटील, एम़ के.पाटील, आऱ एस़ राजहंस, ए़ आऱ पाटील, शेरकर, गोपीनाथ कोकाटे आदींचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)