सुपा येथे नाभिक समाजबांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:58+5:302021-06-03T04:15:58+5:30

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा व परिसरातील गावातील नाभिक समाजबांधवांना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या हस्ते जीवनावश्यक ...

Distribution of essential commodities to the nuclear community at Supa | सुपा येथे नाभिक समाजबांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सुपा येथे नाभिक समाजबांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा व परिसरातील गावातील नाभिक समाजबांधवांना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

लॉकडाऊनमुळे जवळपास दोन महिन्यांपासून नाभिक समाजातील कारागीर, व्यावसायिक घरीच आहेत. अशा स्थितीत त्यांच्या अडचणींत वाढ झाली असल्याचे जिल्हा नाभिक मंडळाचे उपाध्यक्ष सुनील जाधव यांनी सांगितले. कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविणेही अवघड झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जाधव यांनी सुजित झावरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यातूनच जीवनावश्यक साहित्याचे झावरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी उद्योजक योगेश रोकडे, यशराज उद्योग समूहाचे सुनील थोरात, माजी सरपंच विजय पवार, बाळा रोकडे, कृष्णा कोल्हे, सागर सूर्यवंशी, सुनील जाधव, रामभाऊ जाधव, आप्पासाहेब कोकाटे, राहुल पंडित, योगेश गोयल, रोहन साळुंखे, संतोष शिंगाडे, संजय काळे, विकास पंडित, नामदेव गोरे, गणेश जाधव, सुनील वाघमारे, संदीप वाघमारे, नवनाथ कुटे, चंद्रकांत शिंदे, आबा शिंदे आदी उपस्थित होते.

---

०२ सुपा न्यूज

सुपा येथे नाभिक समाजबांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, सुनील जाधव, उद्योजक योगेश रोकडे व इतर.

Web Title: Distribution of essential commodities to the nuclear community at Supa