जि. प. कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय कडूस, उपाध्यक्षपदी काळापहाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:33+5:302021-08-28T04:24:33+5:30
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवडी झाल्या. अध्यक्षपदासाठी कडूस यांच्या नावाची ...

जि. प. कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय कडूस, उपाध्यक्षपदी काळापहाड
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवडी झाल्या.
अध्यक्षपदासाठी कडूस यांच्या नावाची सूचना शशिकांत रासकर यांनी मांडली. त्यास वालचंद ढवळे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी काळापहाड यांच्या नावाची सूचना मोहन जायभाये यांनी मांडली. त्यास सुभाष कराळे यांनी अनुमोदन दिले. निवड प्रक्रियेवेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे वरिष्ठ सहायक व्ही. के. मुटकुळे, संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र पवार व उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे यांनी सहकार्य केले. यावेळी संचालक अरूण जोर्वेकर, प्रताप गांगर्डे, भरत घुगे, सुभाष कराळे, संतोष नलगे, सोपान हरदास, संजू चौधरी, अरुण शिरसाठ, विलास वाघ, ज्ञानदेव जवणे, हरी शेळके, नारायण बोराडे, इंदू गोडसे, उषा देशमुख, शशिकांत रासकर, बाबासाहेब पंडित, सभासद आबासाहेब घोडके, भाऊसाहेब कुर्हे, श्रीकांत भगत, शांतीलाल डोभाळ, चंद्रकांत वाघचौरे आदी उपस्थित होते.
कडूस म्हणाले की, सोसायटीच्या संचालक मंडळाने पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी संधी देऊन मोठा विश्वास दाखविला आहे. चांगल्या कामाची ही पोचपावती आहे. पाच वर्षात जवळपास सर्व आश्वासने पूर्ण करून सभासद हिताचा कारभार केला आहे. संस्था व सभासद हितासाठी आम्ही कायम कटिबद्ध असून, येत्या काळातही असेच निर्णय घेण्याचा प्रयत्न राहील.
काळापहाड म्हणाले की, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी सभासदांसाठी कामधेनू आहे. संस्थेचा कारभार करताना सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातात. यापूर्वीही या पदावर काम करण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा सर्वांनी विश्वास प्रकट केला असून, संस्थेची घोडदौड आगामी काळातही कायम राखण्याचा प्रयत्न करू.
.....................
२६ झेडपी सोसायटी
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे नूतन अध्यक्ष संजय कडूस व उपाध्यक्ष अशोक काळापहाड यांचा निवडीनंतर सत्कार करताना संचालक अरुण जोर्वेकर, सुभाष कराळे, शशिकांत रासकर, व्यवस्थापक राजेंद्र पवार आदी.