जवळ्यातील मंदिरातच घेतले भाविकांनी विठ्ठल दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:16+5:302021-07-24T04:14:16+5:30
जवळा : आषाढी एकादशी निमित्त जामखेड तालुक्यातील जवळा येथील विठ्ठल मंदिरातील विठ्ठल-रूक्मिणी मूर्तीचे मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. मूर्तीवरील ...

जवळ्यातील मंदिरातच घेतले भाविकांनी विठ्ठल दर्शन
जवळा : आषाढी एकादशी निमित्त जामखेड तालुक्यातील जवळा येथील विठ्ठल मंदिरातील विठ्ठल-रूक्मिणी मूर्तीचे मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. मूर्तीवरील अलंकार आणि वस्त्र घालण्याची पद्धत हुबेहूब पंढरपूरच्या विठ्ठलासारखी असल्याने याच ठिकाणी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
बारावी शिक्षण झालेला बबलू वाघमारे याची जवळा येथील विठ्ठल मंदिर सेवा ही या भागातील कौतुकाचा विषय आहे. पंढरपूरला विठ्ठल मंदिरात ज्या पद्धतीने दैनंदिन नित्य सेवा होते. अगदी त्याच पद्धतीने जवळा येथील विठ्ठल मंदिरात गेली अनेक वर्षांपासून नित्य सेवा केली जाते. अवघा २५ वर्ष वयाचा असलेला विठ्ठल भक्त बबलू वाघमारे हा नित्यनियमाने मनोभावे ही सेवा करत आहे. अभ्यंगस्नानापासून ते वस्त्र घालणे, अलंकार चढविण्यापासून, आरती करणे अशी दैनंदिन कामे वाघमारे मनोभावे करतो.
पहाटे साडेचार वाजता काकडा आरती, सकाळी सात वाजता अंघोळ व वस्त्र घालणे, सकाळी दहा वाजता नैवद्य, सायंकाळी सात वाजता हरिपाठ, सायंकाळी साडेसात वाजता संध्या आरती व रात्री दहा वाजता सेज आरती अशी दैनंदिन नित्य सेवा तो कसलेही शुल्क किंवा मानधन न घेता प्रसंगी पदरमोड करत विठ्ठलाची नित्य सेवा करत आहे. हे करताना मंदिराची सकाळ, संध्याकाळ साफसफाई करणे, अशी कामेही तो करत असतो. याकामी त्याचे वडील आबासाहेब वाघमारे व विठ्ठल भक्तांची ही मदत होते.