शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोघांच्या भांडणात जामखेड शहराचा विकास थांबला; एकनाथ शिंदे यांची राम शिंदे, रोहित पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:45 IST

मी कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

DCM Eknath Shinde: जामखेडमध्ये सत्तेची लढाई सुरू आहे. प्रस्थापितांच्या विरुद्ध ही लढाई जिंकायची आहे. इथे अनेक समस्या आहेत. जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे हे घडत आहे. एकाने निधी आणला, की दुसन्याने हाणून पाडायचे. दोघांच्या भांडणात योजना बंद पडल्या. इथे सत्तेची आणि स्वार्थाची लढाई सुरू आहे. आपल्याला येथील राजकीय मक्तेदारी मोडीत काढायची आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार या दोघांवरही टीका केली.

जामखेड येथे  झालेल्या प्रचार सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. शिवसेनेच्या हातात नगरपरिषद सत्ता द्या, तुमचे रस्ते, पाणी, गटार योजना पूर्ण करण्याचे आश्वासन देतो असे ते म्हणाले. राजकारणाची मक्तेदारी मोडीत काढून सामान्य माणसाला विकासाचा केंद्र बिंदू मानून विकासासाठी परिवर्तन करावयाचे आहे. नगर विकास खाते माझ्याकडे आहे. शहरात चांगले गार्डन, रस्ते दिल्या शिवाय राहणार नाही, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

"मी मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले. शिवसेना नेहमी अॅक्शन मोडवर असते. मी सभेला येणार नाही अशा अफवा पसरवल्या होत्या. मी कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता आहे," असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde blames Pawar, Shinde feud for stalled Jamkhed development.

Web Summary : Eknath Shinde criticized Ram Shinde and Rohit Pawar, alleging their power struggle halted Jamkhed's development. He promised development under Shiv Sena rule, focusing on roads, water, and gardens, aiming to break political monopolies and prioritize common citizens.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRohit Pawarरोहित पवारRam Shindeराम शिंदे