दशमीगव्हाण परिसरातील रस्ता दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST2021-07-07T04:26:09+5:302021-07-07T04:26:09+5:30

चिचोडी पाटील : जोपर्यंत नगर-जामखेड रस्त्यावरील दशमीगव्हाण परिसरातील खराब झालेला रस्ता पुन्हा दुरुस्त होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा ...

Demand for road repairs in Dashmigavan area | दशमीगव्हाण परिसरातील रस्ता दुरुस्तीची मागणी

दशमीगव्हाण परिसरातील रस्ता दुरुस्तीची मागणी

चिचोडी पाटील : जोपर्यंत नगर-जामखेड रस्त्यावरील दशमीगव्हाण परिसरातील खराब झालेला रस्ता पुन्हा दुरुस्त होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा भाजपचे नगर तालुकाध्यक्ष तथा चिचोडी पाटीलचे सरपंच मनोज कोकाटे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अधिकारी दिलीप तारडे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे यांचे स्वीय सहायक किरण धावने, दशमीगव्हाणचे उपसरपंच बाबासाहेब काळे उपस्थित होते. नगर-जामखेड रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्ता दुरुस्तीसाठी अनेकदा निवेदन, आंदोलन केल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी रस्त्याची दुरुस्ती झाली. त्यानंतर रस्ता चकाचक झाला. मात्र दशमीगव्हाण ते सांडवा फाटा हद्दीत काही ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट झाले. त्यामुळे रस्ता खचला आहे. त्यामुळे वाहन अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

040721\0135img-20210702-wa0167.jpg

दशमी गव्हाण : नगर जामखेड रस्त्यावर दशमी गव्हाण येथे रस्त्याची अशी दुरावस्था झाली आहे .

Web Title: Demand for road repairs in Dashmigavan area