वीटभट्टी मालकावर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:21 IST2021-03-26T04:21:13+5:302021-03-26T04:21:13+5:30

यावेळी संविधान नायक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष विश्‍वास वैरागर, रामदास क्षीरसागर, बाबासाहेब वैरागर, सोमनाथ ओहळ, सुरेश शिरसाठ, आदी उपस्थित होते. चिंचपूर ...

Demand for action against brick kiln owner | वीटभट्टी मालकावर कारवाई करण्याची मागणी

वीटभट्टी मालकावर कारवाई करण्याची मागणी

यावेळी संविधान नायक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष विश्‍वास वैरागर, रामदास क्षीरसागर, बाबासाहेब वैरागर, सोमनाथ ओहळ, सुरेश शिरसाठ, आदी उपस्थित होते. चिंचपूर (ता. पाथर्डी) येथे दोघेजण अनधिकृतपणे वीटभट्टी चालवीत आहे. तेथे काकासाहेब वैरागर व त्यांचे कुटुंबीय (रा. ब्राह्मणी, ता. राहुरी) पंधरा वर्षांपासून वीटभट्टी मजूर म्हणून काम करीत आहे. मालकाने वीटभट्टी मजूर असलेल्या वैरागर कुटुंबीयांना डांबून ठेवले आहे. त्यांच्या लहान मुलांना अवजड काम करण्यास भाग पाडले जात आहे. महिलांशीदेखील असभ्यपणे वागले जात आहे. मारहाणही केली जात आहे. कामगारांना पैसे देऊन खरेदी केले असल्याचे सांगितले जात आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या निवेदनाची दखल घ्यावी व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Demand for action against brick kiln owner