शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
3
"मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
4
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
5
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
6
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
7
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
8
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
9
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
10
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
11
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
12
सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
13
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
14
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
15
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
16
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
17
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
18
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
19
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
20
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटानंतर उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST

करंजी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर बसताच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. बहुतांश शेतकऱ्यांना दोन ...

करंजी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर बसताच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. बहुतांश शेतकऱ्यांना दोन लाख रूपयांपर्यंत कर्ज माफीही मिळाली. मात्र काेरोनाने यासह इतर विकासकामांना खीळ बसली. कोरोना संकटानंतर उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी ग्वाही मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ शनिवारी सकाळी झाला. यावेळी ते बाेलत होते.

गडाख म्हणाले, कोरोनाच्या संकटात शिवसैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गरजूंना मदत केली. मिरी-करंजी जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या गटातील स्व. मोहनराव पालवे व स्व. अनिल कराळे यांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे या भागात शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम करू, अशी ग्वाही ही गडाख यांनी दिली.

गडाख यांचा करंजी ग्रामस्थांच्या वतीने शरद अकोलकर, अशोक अकोलकर, आबासाहेब अकोलकर आदींनी सन्मान केला. यावेळी शिवसेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, राजेंद्र दळवी, उषाताई कराळे, उद्धव दुसुंग, भरत वांढेकर, सुरेश वाघ, रफिक शेख, शरद अकोलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व नियोजन रफिक शेख यांनी केले.

गडाख यांनी मंत्री झाल्यानंतर प्रथमच पाथर्डी तालुक्यास भेट दिली. मिरी, भोसे, गितेवाडी, घाटशिरस, देवराई, मोहोज सह अनेक गावातील ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला.