एकविरा चौकात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:20 IST2021-05-17T04:20:09+5:302021-05-17T04:20:09+5:30

... तपोवन रस्त्यावर युवकांची धुलाई अहमदनगर : तपोवन रस्त्यावर विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांची पोलिसांनी शनिवारी चांगलीच धुलाई केली. पोलिसांनी वाहने ...

Crowd at Ekvira Chowk | एकविरा चौकात गर्दी

एकविरा चौकात गर्दी

...

तपोवन रस्त्यावर युवकांची धुलाई

अहमदनगर : तपोवन रस्त्यावर विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांची पोलिसांनी शनिवारी चांगलीच धुलाई केली. पोलिसांनी वाहने थांबविण्यातच दुचाकीवरून युवक पसार झाले. दरम्यान, एकास पकडून पोलिसांनी चांगलाच चोप दिला.

.....

इमापूर येथे पाइपलाइनचे काम सुरू

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गाच्या बाजूने पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. जेसीबीने चर खोदून मोठे पाइप टाकण्यात येत असूून, एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे.

....

आजपासून लसीकरण पुन्हा सुरू

अहमदनगर : महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेली लसीकरण मोहीम रविवारी बंद होती. ही मोहीम सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असून, शहरातील सात आरोग्य केंद्रांवर कोविशिल्डचा दुसरा डोस ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना दिला जाणार आहे.

....

सोशल मीडियावर मनपा जोरात

अहमदनगर : महापालिकेच्या वतीने सोशल मीडियावर लसीकरण, बेड, कोविड केअर सेंटर आदींची माहिती असलेल्या जाहिराती व्हायरल करण्यात येत आहेत. या जाहिरातींमुळे सध्या महापालिका प्रशासन चांगले चर्चेत आले आहे.

....

Web Title: Crowd at Ekvira Chowk