दुर्गम, आदिवासी भागात पोहोचली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:55+5:302021-03-26T04:20:55+5:30

पारनेर : दुर्गम भागातील आदिवासी, वयोवृद्ध नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्या भागातच कोरोना लसीकरण करण्यासाठी वनकुट्याचे ...

Corona vaccine reaches remote, tribal areas | दुर्गम, आदिवासी भागात पोहोचली कोरोना लस

दुर्गम, आदिवासी भागात पोहोचली कोरोना लस

पारनेर : दुर्गम भागातील आदिवासी, वयोवृद्ध नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्या भागातच कोरोना लसीकरण करण्यासाठी वनकुट्याचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांनी आमदार नीलेश लंके यांच्यामार्फत केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. वनकुटे (ता. पारनेर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणास प्रारंभही झाला आहे.

वनकुटे परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव वास्तव्यास असून, त्यांना कोरोना लसीकरणासाठी टाकळी ढोकश्‍वर अथवा खडकवाडी येथे जाता येणे शक्य नव्हते. ठराविक ठिकाणीच ही लस उपलब्ध असल्याने त्यांच्या लसीकरणाचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यांची अडचण लक्षात घेऊन वनकुट्याचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांनी ही समस्या आमदार नीलेश लंके यांच्या कानावर घातली. लंके यांनी तत्काळ आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी खास बाब म्हणून व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सरपंच अ‍ॅड. झावरे यांनी संबंधितांकडे पाठपुरावा केल्यानंतर बुधवारी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात प्रत्यक्ष लसीकरणास प्रारंभ झाला.

बुधवारी २४४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. राहुल झावरे, देवराम गागरे, नारायण गागरे, कारभारी मुसळे, काशिनाथ भगत, रामदास शेलार, बबन मुसळे, अण्णा गिरी, उत्तम खैरे, गबाजी गुंजाळ, साहेबराव गागरे, बबन साळवे, बबन गागरे, श्रीरंग ससाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप देठे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अमोल झावरे, औषध निर्माण अधिकारी स्वाती ठुबे, आरोग्य सेविका वंदना डेरे, आदी उपस्थित होते.

---

२५ वनकुटे

वनकुटे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण केंद्राचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Corona vaccine reaches remote, tribal areas