कोरोना महामारीत ‘मार्ग’चे काम दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST2021-09-25T04:20:46+5:302021-09-25T04:20:46+5:30
स्वप्नील देशमुख व जीकेएन कंपनीच्या कामाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने (लंडन) नोंद घेत त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट हा ...

कोरोना महामारीत ‘मार्ग’चे काम दिशादर्शक
स्वप्नील देशमुख व जीकेएन कंपनीच्या कामाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने (लंडन) नोंद घेत त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पवार बोलत होते. बुधवारी शहरातील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे उपाध्यक्ष महेबूब सय्यद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डब्ल्यूबीआरचे सचिव दिब्यारंजन परीडा, कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सावंत, सचिन ढेरे, विजय दळवी आदी उपस्थित होते.
जीकेएन सिंटर मेटल्स लिमिटेड कंपनीचे इंडिया ऑपरेशन संचालक राजेश मिराणी व नगर युनिटचे संचालक पुरुषोत्तम ऋषी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रास्ताविक जीकेएन कंपनीचे एच. आर. हेड बाबासाहेब खिलारी यांनी केले. सूत्रसंचालन श्नायडर इलेक्ट्रिक कंपनीचे चैतन्य खानवेलकर यांनी केले. कार्यक्रमाला श्नायडर इलेक्ट्रिकचे एच. आर. हेड श्रीकांत गाडे, एक्साईड इंडस्ट्रीचे प्रमुख अरविंद कुलकर्णी, रुमा घोष, लेबर कॉन्टॅक्टर सचिन ठोसर आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मार्ग ग्रुपचे सदस्य सचिन ठोसर, ज्ञानेश्वर डमाळे, चैतन्य खानवेलकर, सुभाष तोडकर, बाबासाहेब खिलारी, महेंद्र त्रिगुणे, संग्राम कदम यांनी परिश्रम घेतले.
-------------------------
फोटो २४ पुरस्कार
ओळी- मार्ग संस्थेचे संस्थापक स्वप्नील देशमुख व जीकेएन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजेश मिराणी, पुरुषोत्तम ऋषी यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे उपाध्यक्ष महेबूब सय्यद यांच्यासह मार्ग संस्थेचे सदस्य.