शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीतून काढण्यासाठी षडयंत्र

By admin | Updated: August 17, 2014 00:03 IST

श्रीगोंदा : पक्ष सोडण्यासाठी आपल्याविरोधात षडयंत्र करण्यात आले. मी जर तोंड उघडले तर षडयंत्र रचणारांची पळताभुई थोडी होईल, असा टोला आ.बबनराव पाचपुते यांनी अजित पवार व मधुकर पिचड यांना मारला.

श्रीगोंदा : पक्ष सोडण्यासाठी आपल्याविरोधात षडयंत्र करण्यात आले. मी जर तोंड उघडले तर षडयंत्र रचणारांची पळताभुई थोडी होईल, असा टोला आ.बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री मधुकर पिचड यांना मारला. श्रीगोंदा येथे शुक्रवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी पक्ष सोडल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांनी पवार काका-पुतण्यासह पिचड यांच्यावर टीका केली.आगामी विधानसभा अपक्ष अथवा भाजपाच्या तिकीटावर लढण्याचा कार्यकर्त्यांनी मेळाव्यात निर्धार केला. आ. पाचपुते म्हणाले, २००४ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर युतीच्या नेत्यांनी चार आमदार घेऊन या, तुम्हाला मुख्यमंत्री करतो, अशी आॅफर दिली होती. परंतु शरद पवारांना आपण पाठिंबा दिला. मी काका-पुतण्यांना कुकडीचे पाणी, रस्त्यासंदर्भात अडचणी सांगितल्या. मी पक्ष सोडणार अशी चर्चा त्यांच्या कानावर गेली, परंतु त्यांनी मला साधा फोन सुद्धा केला नाही, याचे मला दु:ख झाले. मी लोकसभा निवडणुकीत राजीव राजळे यांचे जबाबदारीने काम केले. वास्तव परिस्थिती समजून न घेता पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या सांगण्यावरून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मला शरद पवार यांनी खूप दिले. मीही पक्षासाठी अहोरात्र काम केले. मला उमेदवारीसाठी सहा तास दारात बसविले. कारखान्याचे मंजूर झालेले कर्ज अडविले. पक्षात मानसन्मान मिळाला नाही. मी जितेंद्र आव्हाड यांना पक्षात घेतले आणि ते माझ्या विरोधात चुकीचे बोलले. धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी मागणी केली. परंतु आमच्या विरोधात चुकीची माहिती नेत्यांना दिली, असा आरोप त्यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)