साईबाबा संस्थानचा अध्यक्ष काँग्रेसचा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:27+5:302021-06-20T04:15:27+5:30

यावेळी तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका सानप, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, ...

Congress should be the president of Sai Baba Sansthan | साईबाबा संस्थानचा अध्यक्ष काँग्रेसचा करावा

साईबाबा संस्थानचा अध्यक्ष काँग्रेसचा करावा

यावेळी तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका सानप, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, युवक कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गोंदकर, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी आदी उपस्थित होते. या बैठकीत राहाता तालुका काँग्रेसचे बाळासाहेब खर्डे यांनी शिर्डी संस्थानचा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचा करावा व अध्यक्षपद आमदार डाॅ सुधीर तांबे यांना द्यावे. असा एकमताने ठराव करण्यात आला. स्मितल वाबळे, सुभाष सांगळे, श्रीकांत मापारी, बाळासाहेब खर्डे, सचिन चौगुले, सुरेश आरणे, रावसाहेब बोठे, यांची यावेळी भाषणे झाली. या बैठकीस भास्कर फणसे, रमेश गागरे, उमेश शेजवळ, पंकज लोंढे, राजेंद्र निर्मळ, सचिन गाडेकर, नितीन सदाफळ, आमृत गायके, सार्थक करमसे, सुभाष निर्मळ, युनुसभाई, मुन्ना फिटर, अरुण जाधव, अभिषेक वाघमारे, मदन मोकाटे, यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र निर्मळ यांनी आभार मानले.

190621\img-20210619-wa0102.jpg

राहाता काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बोलताना अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका सानाप

Web Title: Congress should be the president of Sai Baba Sansthan