चाचणीचा अहवाल कळत नसल्याने नागरिकांत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:42+5:302021-06-10T04:15:42+5:30
शिर्डी येथील साईनाथ आरटीपीसीआर लॅब सुरू करण्यात आली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येणारे नमुने राहाता तालुक्यातील शिर्डी येथील ...

चाचणीचा अहवाल कळत नसल्याने नागरिकांत संभ्रम
शिर्डी येथील साईनाथ आरटीपीसीआर लॅब सुरू करण्यात आली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येणारे नमुने राहाता तालुक्यातील शिर्डी येथील साईनाथ लॅबला पाठवावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिशानिर्देश दिल्याने सर्व नमुने शिर्डी येथे पाठविले जात आहेत. मोबाइल एसएमएस या सुविधा नसल्याने अनेक नागरिकांचे अहवाल त्यांच्या मोबाइलवर मिळत नसल्याने डाउनलोड करता येत नाही. स्राव घेतल्यानंतर तुमचा अहवाल मोबाइलवर प्राप्त होईल, अशा सूचना दिल्या जातात.
.......
३१ मार्चला घशातील चाचणी केली. त्याचा अहवाल अजूनही मिळाला नसल्याने मला कंपनीत कामासाठी जाता येईना. नाकातील चाचणी करून निगेटिव्ह असल्याचा अहवाल घेतला.- हर्षल मुकिंद, नागरिक, बाबतरा
.......
साईनाथ लॅबकडून सुरुवातीला अडचणी आल्या. आता सुरळीत झाले असून दुसऱ्या दिवशी मेलवर रिपोर्ट प्राप्त होत आहे
-डॉ. कुंदन गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, पुणतांबा