जिल्ह्यात २६ हजार व्यक्तींना सहव्याधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:52+5:302021-06-03T04:15:52+5:30

अहमदनगर : शासनाने एप्रिलअखेर राबविलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात २६ हजार ३८५ संशयित म्हणजे सहव्याधी असलेले ...

Complications to 26,000 people in the district | जिल्ह्यात २६ हजार व्यक्तींना सहव्याधी

जिल्ह्यात २६ हजार व्यक्तींना सहव्याधी

अहमदनगर : शासनाने एप्रिलअखेर राबविलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात २६ हजार ३८५ संशयित म्हणजे सहव्याधी असलेले रुग्ण सापडले. त्या सर्वांची कोरोना चाचणी केली असता त्यात ४ हजार ४२७ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. त्या सर्वांवर आता उपचार झाले आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व लोकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी गावातील आरोग्य पथकाने प्रत्येक घराला भेट देऊन नागरिकांना कोरोनासंदर्भात काही लक्षणे आहेत का याबाबत तपासणी केली. २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत हे सर्वेक्षण झाले. यादरम्यान आरोग्य पथकाने जिल्ह्यातील ८ लाख २३० हजार घरांमध्ये भेट देऊन सुमारे ४१ लाख (९६ टक्के) लोकांची तपासणी केली. त्यामध्ये ९८ पेक्षा जास्त ताप असणारे, ९५ पेक्षा कमी ऑक्सिजन पातळी असलेले, १०० पेक्षा जास्त पल्स रेट असलेले, अंगदुखी, वास न येणे, चव न लागणे, जुलाब होणे, याशिवाय सर्दी, ताप, खोकला, तसेच तीव्र श्वसन दाह अशी लक्षणे असलेली एकूण २६ हजार ३८५ संशयित लोक आढळले. या सर्वांना पथकाने जवळच्या कोविड सेंटरमध्ये जाऊन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महिनाभरात सर्वांची चाचणी झाली. त्यात ४ हजार ४२७ जण पाॅझिटिव्ह आढळले, तर २१ हजार २०६ निगेटिव्ह सापडले. या सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले.

--------------

सहव्याधी असलेल्या व्यक्ती

तालुका सहव्याधी संख्या

अकोले ३९५५

जामखेड १९५८

कर्जत २३३५

कोपरगाव १७२९

नगर २२३१

नेवासा १७८३

पारनेर १२६५

पाथर्डी १२११

राहाता १०५८

राहुरी १५१५

संगमनेर ११२४

शेवगाव १२०९

श्रीगोंदा २१५४

श्रीरामपूर ९८०

एकूण ग्रामीण २४५०७

नगरपालिका १८७८

एकूण जिल्हा २६३८५

--------------

एकूण कुटुंब संख्या - ८,३८,३५५

किती कुटुंबांचे झाले सर्वेक्षण - ८,२३,६५२

----------कोविडचे साडेचार हजार, सारीचे ७८२ रुग्ण

या सर्वेक्षणात सहव्याधीग्रस्त २६ हजार जण आढळले. त्यात ७८२ सारीचे रुग्ण आढळले. त्या सर्वांची कोरोना चाचणी केली असता, ४ हजार ४२७ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले.

--------

फोटो - ०२माझे कुटुंब माझी जबाबदारी १,२,३,४,

Web Title: Complications to 26,000 people in the district