कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST2021-01-15T04:17:39+5:302021-01-15T04:17:39+5:30

यावेळी शेतकरी नेते दशरथ सावंत, संदीप वर्पे, ज्ञानदेव वाफारे, कपील पवार, भानुदास तिकांडे, सुरेश गडाख, मिनानाथ पांडे, अजय फटांगरे, ...

Complete canal works immediately | कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा

कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा

यावेळी शेतकरी नेते दशरथ सावंत, संदीप वर्पे, ज्ञानदेव वाफारे, कपील पवार, भानुदास तिकांडे, सुरेश गडाख, मिनानाथ पांडे, अजय फटांगरे, कार्यकारी अभियंता संगीता जगताप, कार्यकारी अभियंता भरत शिंगाडे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, सहाय्यक अभियंता प्रमोद माने आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, कालव्यांच्या कामांची गती अकोले तालुक्यात खूप कमी आहे. ही गती वाढवा कामात हलगर्जीपणा नको. लहामटे म्हणाले, म्हाळादेवी जलसेतुच्या कामास २० कोटीचा निधी मिळाला आहे. जलसेतुचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होईल. तसेच कालवे खोदाईची कामे ७० टक्के पूर्ण असून कालवे बांधकाम ६० टक्के अपूर्ण आहे. भुसंपादक ३ टक्के बाकी आहे. अंदाजे २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल. सायंकाळी उशिरापर्यंत निळवंडे आढावा बैठक सुरू होती.

( १४ पाटील)

Web Title: Complete canal works immediately