महाराष्ट्र राज्य धोबी समाज (सर्व भाषिक) महासंघाच्यावतीने जामखेड शहरात समाजबांधवांचा जिल्हा मेळावा व कोरोना योद्धा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोनटक्के बोलत होते. यावेळी महासंघाचे कार्याध्यक्ष अनिल शिंदे, युवा प्रदेशाध्यक्ष सचिन कदम, लाॅन्डी प्रदेशाध्यक्ष सुनील पवार, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रंधे, भैय्याजी रोहणकर, धोबी समाज आरक्षण समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप आढाव, दीपक दळवी, विभागीय युवा अध्यक्ष संतोष वाघ, सुधाकर पवार, रवींद्र क्षीरसागर, युवा जिल्हाध्यक्ष प्रसाद राऊत, तालुकाध्यक्ष पांडुरंग नवले. पत्रकार ओंकार दळवी, बंडू पवार आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
आरक्षण समन्वय समितीचे प्रदेश महासचिव अनिल शिंदे यांनी आरक्षणाचा लढाईचा प्रवास, भांडे समितीचा अहवाल आणि परीट-धोबी समाजाची स्थिती यावर अभ्यासपूर्ण माहिती देत संघटन बळकट करण्याचे आवाहन केले. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
फोटो ०७ जामखेड