महाविद्यालयीन युवकास लागली सायकल प्रवासाची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:01+5:302021-01-15T04:18:01+5:30

श्रीगोंदा : कोरोना लाॅकडाऊन काळात बसेस बंद होत्या. या काळात घारगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थी अनिकेत वसंत ढगे याला सायकल ...

The college youth started cycling | महाविद्यालयीन युवकास लागली सायकल प्रवासाची गोडी

महाविद्यालयीन युवकास लागली सायकल प्रवासाची गोडी

श्रीगोंदा : कोरोना लाॅकडाऊन काळात बसेस बंद होत्या. या काळात घारगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थी अनिकेत वसंत ढगे याला सायकल प्रवासाची गोडी लागली. अनिकेत दररोज ४४ किमीचा सायकल प्रवास करीत आहे.

सैन्य दलात जवान होण्यासाठी तोही धडपड करीत आहे.

अनिकेत हा घारगाव येथील साईकृपा महाविद्यालयात एसवायबीएला आहे. भारतीय सैन्य दलात जवान होण्यासाठी तो श्रीगोंदा येथील कौटिल्य प्रशिक्षण केंद्रात धडे घेत आहे.

कोरोना लाॅकडाऊन काळात बसेस बंद होत्या. त्या काळात त्याला घारगाव ते श्रीगोंदा असा प्रवास सायकलवर करावा लागला. त्यानंतर त्याने एक जुनी सायकल खरेदी केली. दररोज ४४ किमीचा सायकलवर प्रवास करून तो सैनिक होण्यासाठी तयारी करीत आहे.

अनिकेत म्हणाला, घरची परिस्थिती गरिबीची आहे. अशा परिस्थितीत आपले ध्येय गाठण्यासाठी परिश्रम घेत आहे. घारगाव ते श्रीगोंदा हा सायकल प्रवास दररोज करत असल्याने शारीरिक फिटनेससाठी मदत झाली. वेळ आणि पैसे वाचत आहे. शिवाय माझा आत्मविश्वास वाढला आहे. शिवाय सायकलवर प्रवास करताना दररोज नवीन मित्र भेटतात परिस्थितीची जाणीव होते.

फोटो : १४ अनिकेत ढगे

Web Title: The college youth started cycling