काळे कारखाना उभारणार सहवीज निर्मिती प्रकल्प

By Admin | Updated: October 2, 2014 00:34 IST2014-10-02T00:30:18+5:302014-10-02T00:34:12+5:30

कोळपेवाडी : साखर कारखानदारीस १५ ते २० वर्षापासून वीज कपातीची झळ बसत आहे़ त्याचा परिणाम उत्पादन खर्चावर होतो़ त्यासाठी २२ मे़वॅटचा सहवीज निर्मिती प्रकल्प कारखान्याने हाती घेतला आहे़

Co-generation construction project to set up black factory | काळे कारखाना उभारणार सहवीज निर्मिती प्रकल्प

काळे कारखाना उभारणार सहवीज निर्मिती प्रकल्प

कोळपेवाडी : साखर कारखानदारीस १५ ते २० वर्षापासून वीज कपातीची झळ बसत आहे़ त्याचा परिणाम उत्पादन खर्चावर होतो़ त्यासाठी २२ मे़वॅटचा सहवीज निर्मिती प्रकल्प कारखान्याने हाती घेतला आहे़ त्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल, परिणामी ऊस उत्पादकांना वाढीव दर देता येईल, असे प्रतिपादन आशुतोष काळे यांनी केले़
कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बारहाते होते़ पुढे बोलताना काळे म्हणाले, पार पडलेल्या गळीत हंगामात १६७ दिवस कारखाना चालला़ त्यात ५ लाख ७१ हजार मे़टन ऊसाचे गाळप होऊन सहा लाख क्विंटल साखर उत्पादन झाले़ त्याचप्रमाणे ४२ हजार क्विंटल कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून त्यापासून ४१ हजार ५०० क्विंटल साखर निर्मिती करण्यात आली़ ३२०० रूपये क्विंटलप्रमाणे विकत असणारी साखर सरकारच्या धोरणामुळे २६०० रूपयांवर आली़ हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे गाळपानंतर पंधरा दिवसांत द्यावे लागतात़ मात्र साखर विक्रीसाठी पंधरा महिने थांबावे लागते़ त्यामुळे साखर साठ्यावर कर्ज घ्यावे लागते़ त्याच्या व्याजाचा बोजा वाढतो, या सर्व बाबींचा परिणाम ऊसाच्या भावावर होतो़ स्व़ शंकरराव काळे यांच्या काळात शेतकऱ्यांनी जो कारखान्यावर विश्वास दाखविला, तसेच सहकार्य सभासदांनी आताही करावे, असे आवाहनही आशुतोष काळे यांनी केले़
आ़ अशोक काळे हे बाहेर गावी असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरून सभासदांशी संवाद साधला़ तालुक्याच्या पाटपाण्यासंदर्भात आपण जो न्यायालयीन लढा देत आहोत़ तो शेतकऱ्यांच्या हिताचा ठरला आहे़ शंकरराव कोल्हे यांच्या म्हणण्यानुसार नुसतेच रस्त्यावर उतरून काहीही साध्य झाले नसते़ नगर, नाशिक जिल्ह्यातील पाणी जायकवाडीत सोडण्यासाठीचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्याला आपला विरोध आहे़ सभासदांनी यासाठी पाठीशी उभे राहवे, असे आवाहनही त्यांनी केले़
डिस्टीलरी विभागाचे जनरल मॅनेजर जे़ए़ भिडे यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला़ त्याच प्रमाणे विक्रमी ऊस उत्पादन करणारे विजय मवाळ, मिनाबाई वसंतरराव जाधव, बाबासाहेब वाघ, सुभाष सानप यांचाही सत्कार करण्यात आला़ विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजुर करण्यात आले़ उपाध्यक्ष बाळासाहेब बारहाते यांनी उपस्थितांचे आभार मानले़ (वार्ताहर)

Web Title: Co-generation construction project to set up black factory