शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांनी टिपा नगर शहराचा ऐतिहासिक वारसा

By admin | Updated: August 19, 2014 23:28 IST

अहमदनगर : हिरवाईने नटलेल्या या परिसराला ऐतिहासिक स्थळांनी आणि वास्तुंनी शिरपेच चढवला आहे.

अहमदनगर : डोंगर-कडेकपारीतल्या निसर्गसौंदर्याने नगरची भूमी समृध्द आहे. धार्मिकदृष्ट्या देशातील महत्वाचे श्रद्धास्थान असलेल्या या जिल्ह्याला शिवरायांच्या पुण्याईचा स्पर्श आहे तर हिरवाईने नटलेल्या या परिसराला ऐतिहासिक स्थळांनी आणि वास्तुंनी शिरपेच चढवला आहे. आपल्या या अहमदनगरचे अलौकिक सौंदर्य टिपण्यासाठी ‘लोकमत उमंग’ अंतर्गत व समर्थ डिजीटल लॅब यांच्या सहकार्याने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जागतिक छायाचित्र दिनानिमित्त’ होणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निसर्गस्थळे/ पर्यटनस्थळे असा विषय आहे. निवड झालेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन नगर-पुणे रोडवरील ओम गार्डन येथे २३ व २४ आॅगस्टला होईल. जिल्ह्यातील रेहेकुरी अभयारण्य, हरिश्चंद्र गड, भंडारदरा धरण या प्रचलित स्थळांव्यतिरिक्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या पुरातन वास्तुही पर्यटकांना आकर्षित करत आहेत. अहमदनगरचे हे सौंदर्य कॅमेराबद्ध करणाऱ्या छायाचित्रकारांना व्यासपीठ देण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा हौशी व व्यावसायिक अशा दोन गटांत होणार आहे. त्यातील छायाचित्राचा आकार ८ बाय १२ इंच असावा व त्याला पांढऱ्या रंगाचे १० बाय १४ माऊंट असावेत. स्पर्धकांनी छायाचित्रास योग्य शीर्षक द्यावे व त्यामागे आपले नाव लिहावे, छायाचित्रावर कोणतेही संगणकीय काम केलेले नसावे. छायाचित्र स्पर्धेसाठी निवडण्याचा अधिकार निवड समितीचा असणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेसाठी निवडलेली छायाचित्रे या प्रदर्शनात लावली जातील. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला रु. ३०००/- चे पारितोषिक, द्वितीय क्रमांक विजेत्यास रु. २०००/- व तृतीय विजेत्यास रु. १०००/- बक्षीस दिले जाईल. याशिवाय दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. इच्छुकांनी आपले छायाचित्र २२ तारखेपर्यंत ‘लोकमत’ कार्यालयात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)क्लिक करा, मदत कराया उपक्रमाला सामाजिक कार्याची झालर देत प्रदर्शनात मांडल्या गेलेल्या छायाचित्रांच्या विक्रीतून मिळणाऱ्या निधीतील रक्कम ‘स्रेहालय’ या संस्थेला देण्यात येणार आहे. तुम्ही कॅमेराबद्ध केलेले नगरचे सौंदर्य स्रेहालयातील बालकांसाठी अर्थसहाय्य करेल.