मुलानेच दिली बापाची सुपारी

By Admin | Updated: December 23, 2015 23:26 IST2015-12-23T23:24:06+5:302015-12-23T23:26:38+5:30

नेवासा : बाप पैसे देत नसल्याच्या रागातून मुलानेच नातेवाईकाच्या मदतीने बापाची सुपारी देऊन खून केल्याचे उघड झाले

The child only gave away the father's betel nut | मुलानेच दिली बापाची सुपारी

मुलानेच दिली बापाची सुपारी

नेवासा : बाप पैसे देत नसल्याच्या रागातून मुलानेच नातेवाईकाच्या मदतीने बापाची सुपारी देऊन खून केल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी आरोपी संतराम मतकर याच्यासह त्याचा मेव्हणा संदीप शेंडगे यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली़ त्यांना न्यायालयात हजर केले असता, २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे १७ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला होता़ या दरोड्यात उमाजी मतकर (वय ६५) यांना बेदम मारहाण करण्यात आली होती़ या मारहाणीत मतकर हे जागीच मयत झाले, तर घरातून ४० हजार रुपयांची रोकड चोरीस गेली होती़ या दरोड्याचा तपास करताना श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक दत्तात्रय कांबळे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, उपनिरीक्षक गणेश जांभळे यांनी गुन्ह्याची उकल करीत मयत उमाजी मतकर यांचा मुलगा संतराम मतकर याला मंगळवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले़ संतराम याने मावस मेव्हणा संदीप मोहन शेंडगे याच्या मदतीनेच दरोड्याच्या बहाण्याने उमाजी यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ संतराम याच्या मुलीच्या लग्नासाठी उमाजी हे पैसे देत नसल्याचे संतराम याने ही दरोड्याची योजना आखल्याची कबुली दिली़ बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The child only gave away the father's betel nut