शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मटका अड्ड्यांवर छापासत्र सुरू

By admin | Updated: April 26, 2016 23:24 IST

अहमदनगर : शहरातील मटका-तिरट खेळणाऱ्या जुगार अड्ड्यांवर कोतवाली आणि तोफखाना पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे.

अहमदनगर : शहरातील मटका-तिरट खेळणाऱ्या जुगार अड्ड्यांवर कोतवाली आणि तोफखाना पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. सोमवारी सायंकाळी राबविण्यात आलेल्या छापासत्रात १२ मटका अड्ड्यांवर कारवाई केली. यामध्ये अड्डा चालवून मटका खेळविणाऱ्या पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत मटका खेळण्याच्या साहित्यासह रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.‘लोकमत’च्या सोमवार (दि. २५) च्या अंकात ‘मटका सुरू ठेवण्यासाठी पोलिसांची आॅफर’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. शहरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यांकडे शहरातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शहर परिसरातील सर्वच पोलीस ठाण्यांना मटका अड्ड्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कोतवाली आणि तोफखाना पोलिसांनी तातडीने पथके रवाना केली आणि तब्बल १२ ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. यामध्ये कोतवाली पोलिसांनी तीन ठिकाणी, तोफखाना पोलिसांनी आठ ठिकाणी तर कॅम्प पोलिसांनी एका ठिकाणी कारवाई केली.बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलच्या कंपाऊंडलगत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून संतोष झुंबर गाडे (रा. चिचोंडी पाटील) याला अटक केली. त्याच्याकडून ६६० रुपये रोख व मटका खेळण्याचे साहित्य जप्त केले. कल्याण रोडवरील बालाजी सोसायटीजवळ छापा टाकून सूर्यकांत प्रभाकर बिलाड याला अटक केली. या अड्ड्यावर २ हजार रुपये रोख जप्त केले. इम्पिरिअल चौकात शौकत सय्यद याला अटक करून पाचशे रुपये जप्त केले. तो मुंबई मटका चालवित होता.तोफखाना पोलिसांनी सावेडी नाका येथे छापा टाकून दीपक बाळासाहेब रेंगदळ याला अटक केली. कल्याण मटक्यावर लावलेले ५७० रुपये जप्त केले. नेप्ती नाका चौकातील टपरीजवळ भाऊ माणिकराव वाघमारे (वाघगल्ली, नालेगाव) याला १ हजार २३० रुपयांसह अटक केली. अमरधाम परिसरात अजीज अब्दूल पठाण याला एक हजार रुपयांसह ताब्यात घेतले. बालिकाश्रम रोडवरील नीलक्रांती चौकात संजय पोपटलाल गुंदेचा (रा. बागडे मळा) याला १ हजार १४० रुपयांसह अटक केली. सर्जेपुरा चौकात नाना वडेवाले यांच्या टपरीजवळ अश्पाक शब्बीर शेख (रा. बेलदार गल्ली) याला ३७० रुपये आणि मटक्याच्या साहित्यासह अटक केली. कोंड्यामामा चौकात सत्तार गफार शेख (रा. कोठला) हा लोकांकडून पैसे घेवून जुगार लावत होता. त्याच्याकडून ४७० रुपये जप्त केले. भिस्तबाग चौकात म्हसोबा मंदिराजवळ शिरीष शरदचंद्र शेटे (रा. एमआयडीसी) हा मटका खेळविताना आढळून आला. २९० रुपयांसह साहित्य जप्त केले.कल्याण आणि मुंबई मटका तेजीतशहरात आणि ग्रामीण भागात कल्याण आणि मुंबई मटका सध्या तेजीत आहे. पूर्वी एक मटका सकाळी, तर दुसरा मटका दुपारनंतर लागायचा. आता दोन्ही मटके दिवसभर खेळले जात असून काहीवेळानंतर त्याचे निकाल येतात. त्यामुळे दिवसभर छुप्या पद्धतीने मटका खेळविला जातो. टपरी, हॉटेल, मंदिर भिंतीच्या आडोशाला थांबून मटका सुरू होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामध्ये तिरट हा प्रकारही तेजीत होता. अनेक दिवसांपासून खेळविला जात असलेल्या मटका अड्ड्यांवर अचानक छापे सुरू झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.