शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
4
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
5
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
6
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
7
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
8
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
9
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
10
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
11
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
12
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
13
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
14
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
15
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
16
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
17
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
18
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
19
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
20
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षा गुंड घेणार मंगळवारी पदभार

By admin | Updated: September 28, 2014 23:25 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या कर्जतच्या मंजूषा गुंड मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या कर्जतच्या मंजूषा गुंड मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार अजून मुहूर्ताच्या शोधात असून विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे हा कार्यक्रम लांबला आहे. जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर रणनिती आखत सेना-भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यात आले. अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या श्रीगोंद्याच्या गुंड यांना तर उपाध्यक्षपद काँग्रेसचे श्रीगोंद्याचे शेलार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने एकमेंकाच्या समोर असल्याने जिल्हा परिषदेतील या सत्तेचा त्यांना फारसा उपयोग होणार नाही. श्रीगोंद्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या विरोधात सर्व पक्षाने ताकद एकवटली. त्यासाठी शेलार यांना पद दिलेले आहे. अध्यक्ष गुंड यांना अध्यक्षपद मिळू नये, यासाठी कर्जत तालुक्यातून विरोध झाला. मात्र, विधानसभा निवडीचे तिकीट डोळ्यासमोर ठेवून झालेला विरोध मावळालाही. या दोन्ही पदाच्या निवडी झाल्यानंतर साधारण आठ दिवसांचा कालावधी लोटलेला आहे. मात्र, नूतन पदाधिकाऱ्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची धूम सुरू आहे. यामुळे नूतन पदाधिकारी पक्षाच्या प्रचारात रमले आहेत. यातून मंगळवारी गुंड पदभार स्वीकारणार असल्याची माहिती देण्यात आली तर शेलार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप पदभार स्वीकारण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. (प्रतिनिधी)