कोपरगावमध्ये कोल्हे समर्थकांचा आनंदोत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 14:38 IST2019-10-01T14:18:20+5:302019-10-01T14:38:25+5:30

कोपरगावमधून भाजपने पुन्हा आमदार स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे़ त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी कोपरगावमध्ये जल्लोष केला. पेढे भरवरुन कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. 

Celebration of Kaleh supporters in Kopargaon | कोपरगावमध्ये कोल्हे समर्थकांचा आनंदोत्सव 

कोपरगावमध्ये कोल्हे समर्थकांचा आनंदोत्सव 

कोपरगाव: कोपरगावमधून भाजपने पुन्हा आमदार स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे़ त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी कोपरगावमध्ये जल्लोष केला. पेढे भरवरुन कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. 
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गतवेळी भाजपकडून स्नेहलता कोल्हे निवडून आल्या होत्या़ यावेळी भाजपकडून इच्छुकांची संख्या वाढली होती़ त्यात राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कोल्हे यांना उमेदवारी मिळते की नाही, याबाबत उत्सुकता होती़  विखे यांचे मेव्हणे राजेश परजणेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. विजय वहाडणे यांनीही उमेदवारी मागितली होती. सेनेकडून राष्ट्रवादीचे अशुतोष काळे हेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. हा मतदारसंघ सेनेच्या कोट्यात घेण्याचेही प्रयत्न होते. मात्र कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने इतरांचा पत्ता कापला गेला आहे. काळे आता राष्टÑवादीकडून की अपक्ष लढणार याबाबत उत्सुकता आहे. राजेश परजणे हे देखील अपक्ष उमेदवारी करतील अशी शक्यता आहे. परजणे यांनी माघार घेऊ  नये म्हणून त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव आहे.

Web Title: Celebration of Kaleh supporters in Kopargaon