शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील बैठकीकडे उद्योजकांच्या नजरा

By admin | Updated: September 6, 2016 00:48 IST

अहमदनगर : नागापूर औद्योगिक वसाहतीतील बेकायदेशीर वाटप झालेल्या भूखंडाबाबत औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत बैठक होत आहे़

अहमदनगर : नागापूर औद्योगिक वसाहतीतील बेकायदेशीर वाटप झालेल्या भूखंडाबाबत औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत बैठक होत आहे़ दरम्यान याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला केलेल्या सूचनेवरून ही बैठक होत असून, या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे़ नागापूर औद्योगिक वसाहतीतील बेकायदेशीर भूखंड वाटपाचा प्रश्न सध्या चांगलाच गाजतो आहे़ नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयाकडून १७३ उद्योजकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ ही संख्या आणखी वाढणार आहे़ बेकायदेशीर वाटप झालेले भूखंड ताब्यात घेवून त्यांचा पुन्हा लिलाव करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहे़ नोटिसांची मुदत तीन महिनेहोती़ ती येत्या १४ सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे़ त्यानंतर भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने उद्योजकांमध्ये प्रचंड असंतोष आहे़ उद्योजकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला़ तसेच उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांनाही साकडे घातले़ मध्यंतरी यासंदर्भात मुंबईत बैठकही पार पडली़ मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक विकास महामंडळाला याविषयी लेखी सूचना केल्या असून, त्यानुसार महामंडळाचे मुख्यकार्यकारी अधिकारी सेठी यांनी बुधवारी स्थानिक उद्योजकांची बैठक बोलविली आहे़ बैठकीचे निमंत्रण मोजक्याच उद्योजकांना देण्यात आले असून, विविध संघटनांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित राहणार आहेत़ बैठकीत भूखंड वाटप प्रक्रिया व न्यायालयाच्या निर्णयावर सविस्तर चर्चा होणार आहे़औद्योगिक वसाहतीतील बेकायदेशीर वाटप झालेले १६८ भूखंड ताब्यात घेवून पुन्हा लिलाव करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे़ उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरोधात उद्योजकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती़ मात्र न्यायालयाने खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला़ त्यामुळे बेकायदेशीर भूखंड वाटपातील उद्योग चव्हाट्यावर आले आहेत़ भूखंड वाटपात बड्या अधिकाऱ्यांचाही हात आहे़ उद्योजकांनीही भूखंड घेवून ते नियमित केले़ परंतु, नियमितचा आदेशच न्यायालयाच्या निर्णयामुळे रद्द झाला असून, या निर्णयामुळे नगरसह राज्यातील उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे़ कारण हा निर्णय न्यायालयाने संपूर्ण राज्यात लागू करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे इतर जिल्ह्यांतही असाच प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे़(प्रतिनिधी)