शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

बंधारे, नाल्यांना पाणी

By admin | Updated: June 23, 2016 01:20 IST

शेवगाव : शेवगावसह तालुक्यातील चापडगाव, राक्षी, वाडगाव, थाटे, आखेगाव, खरडगाव, आव्हाणे, चापडगाव आदी परिसरात सोमवारी रात्री

शेवगाव : शेवगावसह तालुक्यातील चापडगाव, राक्षी, वाडगाव, थाटे, आखेगाव, खरडगाव, आव्हाणे, चापडगाव आदी परिसरात सोमवारी रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खरीप पेरण्यांसाठी आता शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण असले तरी गेल्या ४ वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतीसह अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणास बळकटी मिळावी यासाठी मोठ्या पावसाची गरज व्यक्त होत आहे.मंगळवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात शेवगाव मंडळात ४९ मि. मी, भातकुडगाव ३१ मि.मी., एरंडगाव ३५ मि.मी., चापडगाव ६२ मि.मी. तर बोधेगाव मंडळात ११ मि.मी. तर ढोरजळगाव मंडळात केवळ ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चापडगाव व शेवगाव परिसरात दमदार पावसामुळे बंधारे, ओढे, नाल्यांना चांगले पाणी आले असून, पहिल्याच पावसाने अनेक बंधारे भरल्याचे सांगण्यात आले. वरूर बंधाऱ्यातील जवळपास ४ लोखंडी गेट वाहून गेल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली.तालुक्यातील अनेक भागात सुरू असलेल्या पावसामुळे आता खरीप पेरण्यांना वेग येण्याची चिन्हे आहेत. खरीप पेरण्यांसाठी बियाणे व खते उपलब्ध व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रात गर्दी केली आहे. यंदा तूर, मुगाच्या क्षेत्रात वाढ होण्याची माहिती कृषी कार्यालयातून देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)