तीन दिवसानंतर कालव्यात आढळला तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:49+5:302021-06-28T04:15:49+5:30

मयताचे नाव सागर रामदास कांबळे (३०) असे आहे. दोन दिवसांपूर्वी सागर याचे पत्नीशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. रागाच्या ...

The body of the youth was found in the canal three days later | तीन दिवसानंतर कालव्यात आढळला तरुणाचा मृतदेह

तीन दिवसानंतर कालव्यात आढळला तरुणाचा मृतदेह

मयताचे नाव सागर रामदास कांबळे (३०) असे आहे. दोन दिवसांपूर्वी सागर याचे पत्नीशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. रागाच्या भरात त्याने श्रीरामपूर शहरात कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच सागर याच्या नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला. मात्र कालव्याला पाण्याचा वेगवान प्रवाह असल्याने शोध घेण्यात अडचणी आल्या. शहर पोलिसांना माहिती देण्यात आली होती. पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस, उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र कोरडे, पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर, पोलीस नाईक संजय दुधाडे तसेच गृहरक्षक दलाचे जवान यांनी परिसरात तसेच निपाणी वडगाव, अशोकनगर कारखाना या परिसरात शोधमोहीम सुरू राबवली. मात्र मयत सागर कांबळे याचा कुठेही मिळून आला नाही.

रविवारी तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता अशोक कारखाना प्रवेशद्वाराजवळ नागरिकांना पाण्यावर मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांच्या मदतीने मृतदेह कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढला. तरुणाच्या खिशामध्ये मोबाईल आढळून आला.

Web Title: The body of the youth was found in the canal three days later