शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘भंडारदरा’ स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम ठेवा

By admin | Updated: September 14, 2016 23:22 IST

हेमंत आवारी... अकोले वय वर्षे ९०़़, आजही ब्रिटिशकालिन भंडारदरा धरणाचा पाठीचा कणा ताठ असून स्थापत्य शास्त्राचा हा अप्रतिम ठेवा आहे. अवघे ८४ लाख रुपये खर्चून हे धरण बांधण्यात आले.

हेमंत आवारी... अकोलेवय वर्षे ९०़़, आजही ब्रिटिशकालिन भंडारदरा धरणाचा पाठीचा कणा ताठ असून स्थापत्य शास्त्राचा हा अप्रतिम ठेवा आहे. अवघे ८४ लाख रुपये खर्चून हे धरण बांधण्यात आले. आधी शेती सिंचनासाठी पाट-कालवे नंतर दगडी रेखीव भक्कम धरण अशी योजना करुन ब्रिटिशांनी बांधलेल्या जल मंदिराच्या आधारावरच उत्तर नगर जिल्ह्याची शेती फुलली आहे. तसेच समन्यायी पाणी वाटपातून मराठवाड्याला पाणी मिळत आहे.१८७५ ला श्रीरामपूर -राहाता भागात पाण्यासाठी कालवे (पाट) झाले. त्या पाटाला पाणी मिळावे म्हणून संगमनेर तालुक्यात ओझर येथे १८८५ ला ‘पिकअप वॉल’ बांधण्यात आली.१९०५ ला धरणाच्या जागेचे सर्वेक्षण होत १९१० ला भंडारदरा धरणाच्या कामास सुरुवात झाली. गूळ-चुनखडीतील हा दगडी चिऱ्यांचा विल्सन डॅम १९२६ ला पूर्णत्वास गेला. उत्तर नगर जिल्ह्याला जलसंजीवनी मिळावी म्हणून प्रवरेच्या उगमस्थानी ब्रिटिशांनी हा ‘अर्थर लेक’ बांध घातला. त्यावेळी साधन सामुग्री फारशी नसतानाही केवळ १६ वर्षात १० हजार ८६ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे दगडी धरण तयार झाले. ४७ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र असलेल्या धरणाच्या भिंतीची उंची २७८ फूट असून केवळ ८४ लाख १४ हजार १८८ रुपये धरणासाठी खर्च झाले आहेत. २३ हजार ७७ हेक्टर सिंचन क्षमतेच्या भंडारदरा धरणाचे पूर्वीचे नाव ‘विल्सन डॅम’ असे असून ‘आधी कालवे मग धरण’अशी प्रकल्पाची ख्याती आहे. १८८५ च्या दरम्यान ओझर उन्नेय बंधाऱ्यापासून पुढे डावा कालवा ७६ व उजवा कालावा ५३ किलोमीटर लांबीचा असून यामुळे नगर उत्तर जिल्हा बागायती गणला जावू लागला आहे.१९७३ सालाच्या दरम्यान भंडारदरा धरणाच्या भिंतीचे बळकटीकरण करण्यात आले. त्यात १३१ बोअर घेऊन त्यात शिसे ओतण्यात आले असून त्यामुळे ५४० टनाने भिंतीची दाब क्षमता वाढली आहे. तसेच १९४ बोअर घेवून त्यात प्री स्ट्रेस केबल टाकण्यात आली आहे. केबलचे वजन २१० टन व लांबी १० हजार ५५३ फूट आहे. सपोर्टीव्ह दगडी भिंत ‘१४ बटरेस’ बांधण्यात आली आणि ‘स्पिल वे’ गेट बसविण्यात आले. यातून प्रती सेकंदाला ५३ हजार क्युसेक पुराचे पाणी वाहून जाऊ शकते. सर्व उपाय योजनांमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सह्याद्रीचा काळा पाषाण ‘बेसॉल्ट’ खडकावर ८५ मीटर उंचीचा ११ हजार ३९ दलघफु इतका पाणीसाठा कवेत घेवून भंडारदरा धरण दिमाखात उभे आहे. येथील खडकाची दाब सहन करण्याची क्षमता ७ हजार मेट्रीक टन इतकी आहे. पाण्याचा ६० टक्के दाब जवळच्या टेकडीवर स्थिरावतो व केवळ ४० टक्के दाब हा भिंतीवर येतो असे ‘ इंजिनिअरिंग तंत्र’ या धरणासाठी वापरण्यात आले आहे.