कांडेकर वस्तीवर घरफोडीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:27 IST2021-08-17T04:27:00+5:302021-08-17T04:27:00+5:30

------------- राहुरीत घरफोडी अहमदनगर : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्दमध्ये दुकानाचे गोडावून फोडून ६ हजार रूपये किमतीच्या बॅटऱ्या चोरीस गेल्या. ...

Attempted burglary at Kandekar settlement | कांडेकर वस्तीवर घरफोडीचा प्रयत्न

कांडेकर वस्तीवर घरफोडीचा प्रयत्न

-------------

राहुरीत घरफोडी

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्दमध्ये दुकानाचे गोडावून फोडून ६ हजार रूपये किमतीच्या बॅटऱ्या चोरीस गेल्या. याप्रकरणी मुजफर अकबर सय्यद (वय ३२, रा. मौलाना आझादनगर, राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १४ ते १५ ॲागस्ट दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या युनिक ॲाटो कन्सल्ट नावाच्या दुकानाच्या गोडावूनमध्ये घुसून ६ हजार रूपये किमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्या.

--------------

संगमनेरमध्ये चोरी

अहमदनगर : संगमनेर शहरातील बाळकृष्ण मार्केट, रंगार गल्ली येथून १० हजार रूपयांची चोरी झाली. याप्रकरणी आकांक्षा बाबासाहेब जाधव (वय २१, संगमनेर) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जाधव यांचा १० हजार रूपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.

-----------------

ट्रकची चोरी

अहमदनगर : श्रीरामपूर येथील स्टिल कंपनीतून ६ लाख रूपये किमतीची ट्रक चोरीला गेली. याप्रकरणी रेहान आयुब शाह (वय २९, श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १२ ॲागस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सम्राटनगर येथील स्टिल कंपनीतून ६ लाख रूपये किमतीची दहा टायर ट्रक चोरीला गेली.

Web Title: Attempted burglary at Kandekar settlement