लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST2021-04-01T04:21:22+5:302021-04-01T04:21:22+5:30

अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच तिची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी दोघांविरोधात गुन्हा ...

Atrocities on women by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच तिची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून, पोलिसांनी मुकेश पांडुरंग पाठक व अशितोष मुकेश पाठक (दोघे रा. बोल्हेगाव फाटा, गणेश चौक, अहमदनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुकेश पाठक याची दोन वर्षांपूर्वी शहरात राहणाऱ्या एका महिलेशी ओळख झाली होती. मुकेश याने संबंधित पीडितेला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले तसेच घर घेऊन देतो, असे सांगत मुकेश व आशितोष यांनी पीडितेकडून पैसे व दागिने घेऊन फसवणूक केल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरसे हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Atrocities on women by showing the lure of marriage