दीड महिन्यात उखडला डांबरी रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:37+5:302021-06-10T04:15:37+5:30

तळेगाव दिघे मार्गे संगमनेर ते कोपरगाव रस्त्यादरम्यानच्या तळेगाव चौफुली ते समर्थ पेट्रोल पंप दरम्यानच्या डांबरी रस्त्याचे काम महसूलमंत्री बाळासाहेब ...

Asphalt road dug up in a month and a half | दीड महिन्यात उखडला डांबरी रस्ता

दीड महिन्यात उखडला डांबरी रस्ता

तळेगाव दिघे मार्गे संगमनेर ते कोपरगाव रस्त्यादरम्यानच्या तळेगाव चौफुली ते समर्थ पेट्रोल पंप दरम्यानच्या डांबरी रस्त्याचे काम महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून सरपंच बाबासाहेब कांदळकरसहीत पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक मंजूर करून घेतले होते. वाजतगाजत रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले. तळेगाव चौफुली, नवीन पूल ते समर्थ पेट्रोल पंप दरम्यान रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मात्रए अवघ्या दीड महिन्यात हा डांबरी रस्ता उखडण्यास सुरुवात झाली. पदाधिकाऱ्यांनी मागणी करूनही साईडपट्टीच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवाय धोकादायक चौफुली परिसरात गतिरोधकही टाकले नाहीत. रस्ताकामात कमी प्रमाणात डांबर वापरल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्ता उखडण्यास सुरुवात झाली, असे सांगत या रस्ताकामाच्या दर्जाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी सरपंच बाबासाहेब कांदळकर व उपसरपंच रमेशभाऊ दिघे यांनी केली आहे.

...............

दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

तळेगाव दिघे चौफुली ते समर्थ पेट्रोल पंपादरम्यानचा डांबरी रस्ता कामानंतर अवघ्या दीड महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उखडण्यास सुरुवात झाली. संपूर्ण पावसाळ्यानंतर या डांबरी रस्त्याची अवस्था काय असेल ? असा प्रश्न छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे यांनी उपस्थित केला असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

..............

०९

तळेगाव दिघे

तळेगाव चौफुली ते समर्थ पेट्रोल पंप डांबरी रस्ता कामानंतर दीड महिन्यात असा उखडला आहेण

Web Title: Asphalt road dug up in a month and a half