शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST

संगमनेर : तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले स्वस्त धान्य दुकान नेहमीच उशिराने उघडत असल्याची लाभार्थ्यांची तक्रार आहे. गुरुवारी (दि. ...

संगमनेर : तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले स्वस्त धान्य दुकान नेहमीच उशिराने उघडत असल्याची लाभार्थ्यांची तक्रार आहे. गुरुवारी (दि. २९) दुपारी बाराच्या सुमारास दुकान उघडले नसल्याने रेशन घेण्यासाठी आलेले वयोवृद्ध लाभार्थी दुकानाच्या पायरी, ओट्यावर ताटकळत बसले होते. रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार सुरू असून, पुरवठा विभाग कुठलीही ठोस कारवाई करायला तयार नाही.

रेशनकार्डधारकांना धान्य घेणे सोईचे होण्यासाठी सरकार मान्य स्वस्त धान्य दुकाने दररोज सकाळी सात ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते रात्री त्या दिवशीचे लाभार्थ्यांना धान्य वाटप संपेपर्यंत उघडे राहतील, असा नियम आहे; मात्र संगमनेर तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले स्वस्त धान्य दुकान नेहमीच उशिराने उघडत असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. रेशन घेण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध रेशन दुकानदार कधी येऊन दुकान उघडले आणि आपल्याला रेशन मिळेल, याची वाट पाहत होते. रेशन दुकान वेळेत उघडणे अनिवार्य आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या दुकाने चारपर्यंत उघडी असतात. त्यात रेशन दुकानदार दुकान उशिरा उघडतो. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नये, असा नियम आहे; मात्र दुकान उशिरा उघडत असल्याने लाभार्थ्यांची गर्दी होऊन नियमांचे उल्लंघन होते आहे.

----------

ठोस कारवाई करण्याची मागणी

तहसील कार्यालयाजवळ असलेल्या स्वस्त धान्य दुकानाबाबतच्या तक्रारी यापूर्वी तहसीलदार अमोल निकम यांना प्राप्त झाल्या होत्या. लाभार्थी धान्य घ्यायला वेळेत येऊनही दुकान बंद आढळून आल्याने संबंधित दुकानदाराकडे तहसीलदार निकम यांनी खुलासा मागतिला होता; मात्र त्यानंतरही रेशन दुकानदार दुकान उशिराने उघडत असल्याने ठोस कारवाई करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.

----------------

दोन्हीकडून होते नुकसान

रेशन घ्यायला आल्यानंतर दुकान बंद असते. कामावर खाडे करून रेशन घ्यायला यावे लागते. कोरोनामुळे दुपारी चारपर्यंत दुकाने उघडी असल्याने काम कमी झाले आहे. त्यामुळे पगार कमी झाला आहे. रेशन दुकान बंद असल्याने रेशन मिळत नाही आणि कामाचेसुद्धा खाडे होते. त्यामुळे दोन्हीकडून नुकसान होत असल्याचे एका पुरुष लाभार्थ्याने सांगितले.

------------------

फोटो नेम : २९ रेशन दुकान, संगमनेर, ओळ : दुपारी बारा वाजेच्या सुमारास रेशन दुकान उघडले नसल्याने रेशन दुकानदाराची वाट पाहत ताटकळलेले वयोवृद्ध लाभार्थी.