निघोज : निघोज गावातील सामाजिक कार्यकर्ते अनिल रघुनाथ लंके यांची पारनेर तालुका काँग्रेसच्या सेवा दल तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले यांनी नुकतेच लंके यांना दिले. अनिल लंके हे सहकार चळवळीत काम करणारे कार्यकर्ते असून धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून निघोज व परिसरातील सामाजिक कामांच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब गरजू घटकांना आधार देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन सेवा दलाच्या तालुकाध्यक्षपदी संधी दिली असल्याची माहिती संभाजी रोहकले यांनी दिली.
या वेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनील चौधरी, रामकृष्ण पवार, तालुकाध्यक्ष अक्षयराज गायकवाड, डॉ. गुलाब शेख, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष शब्बीर इनामदार, उपाध्यक्ष दिलीप मदगे आदी उपस्थित होते.
---
२३ निघोज लंके
काँग्रेसच्या सेवा दल तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनिल लंके यांचा सन्मान करण्यात आला.