शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविका मोबाइलवरील कामकाज थांबवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST

शासनाने राज्यातील १ लाख ०५ हजार ५९२ अंगणवाडी सेविकांना २०१९ मध्ये मोबाइल दिले होते. या मोबाइलवरून सेविका शासनाला लाभार्थींची ...

शासनाने राज्यातील १ लाख ०५ हजार ५९२ अंगणवाडी सेविकांना २०१९ मध्ये मोबाइल दिले होते. या मोबाइलवरून सेविका शासनाला लाभार्थींची वजन, उंची, हजेरी, स्तनदा मातांचा आहार इत्यादी माहिती पाठवत असतात. हे मोबाइल दोन जीबी रॅमचे आहेत, त्यांची क्षमता कमी आहे. त्यामुळे ते व्यवस्थित चालत नाहीत. मे २०२१ मध्ये त्यांची वॉरंटी संपली आहे. मोबाइल नादुरुस्त झाल्यानंतर दुरुस्तीसाठी खर्च येतो. हा खर्च सेविकांकडून वसूल केला जातो. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने वारंवार महाराष्ट्र शासनाकडे मोबाइल बदलून देण्याची मागणी केली. परंतु निधीचे कारण देत सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सेविकांना मोबाइलवरून काम करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अखेर १७ ऑगस्टपासून मोबाइलच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे. तसेच राज्यभर अंगणवाडी कर्मचारी निकृष्ट मोबाइल शासनाला परत देण्याचे आंदोलन करणार आहे. २३ ऑगस्टला संगमनेर आणि घारगाव प्रकल्प १, घारगाव प्रकल्प २ तसेच २४ ऑगस्टला अकोले व राजूर प्रकल्पातील मोबाइल परत करण्यात येतील. असे अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्ष सत्यभामा थिटमे, सरचिटणीस भारती धरत यांनी सांगितले. सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पूजा घाटकर, इंदुमती घुले, समिना शेख, क्रांती गायकवाड, रेखा अवसरकर, बेबी हरनामे, सुनंदा कदम, अनुसया वराडे, शांताराम गोसावी आदींनी केले आहे.