पतंगोत्सवातील ‘हवा’ गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:21+5:302021-01-15T04:18:21+5:30

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीच्या सणाला फारसा उत्साह नव्हता. पतंग खरेदीतही मोठी घट झाली होती. मकर संक्रांत असली तरी ...

The ‘air’ of the kite festival | पतंगोत्सवातील ‘हवा’ गूल

पतंगोत्सवातील ‘हवा’ गूल

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीच्या सणाला फारसा उत्साह नव्हता. पतंग खरेदीतही मोठी घट झाली होती. मकर संक्रांत असली तरी शासकीय सुटी नसल्याने सकाळपासून होणारी गर्दी यंदा नव्हती. दुपारच्यावेळी पतंग उडविणारे तरुण इमारतीच्या छतावर आले. बराचवेळ प्रयत्न करूनही वारा नसल्याने पतंग उडत नव्हते. त्यात उन्हाचीही तीव्रता बऱ्यापैकी होती. सायंकाळच्या वेळी वारा सुरू झाल्यानंतर पतंगोत्सवाला जोर चढला. दिवसभर ऐकू न येणारे आवाज घुमले. सीडीवर गाण्यांच्या तालावर दोन तास पतंगोत्सव रंगला. सायंकाळपर्यंत नगर शहर व जिल्ह्यात कोणतीही हानी झाली नव्हती. त्यामुळे पतंगोत्सव शांततेत पार पडला.

नगर शहरातील अनेकजण सध्या नातेवाइकांच्या प्रचारासाठी खेडोपाडी आहेत. त्यामुळे पतंगोत्सवावर थोडा परिणाम झाल्याचे दिसले.

-------------

या बातमीला पोलीस कारवाई व महापालिका कारवाईचा जोड संबंधित देतील.

Web Title: The ‘air’ of the kite festival