अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’; राज्य शासनाकडून अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 10:59 IST2024-10-10T10:58:53+5:302024-10-10T10:59:25+5:30

राज्य शासनाने ४ ऑक्टोबरला ‘अहमदनगर’ शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यात येत आहे

ahmednagar district now ahilya nagar | अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’; राज्य शासनाकडून अधिसूचना जारी

अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’; राज्य शासनाकडून अधिसूचना जारी

लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : अहमदनगर शहरानंतर आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली. अहमदनगर तालुका व उपविभागाचे नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात आले आहे. राज्य शासनाने ४ ऑक्टोबरला ‘अहमदनगर’ शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यात येत आहे, असे राजपत्र प्रसिद्ध केले. महसूल व वनविभागाने ८ ऑक्टोबरला अहमदनगर जिल्हा, उपविभाग, अहमदनगर तालुका व अहमदनगर गाव यांचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्यात येत आहे, अशी अधिसूचना प्रसिद्ध केली.

शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले असले तरी स्थानिक पातळीवर प्रशासनाने याबाबत नागरिकांना बुधवारी सायंकाळपर्यंत अधिकृतपणे काहीही अवगत केलेले नाही. 

 

Web Title: ahmednagar district now ahilya nagar