शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ९३६८ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:18 IST

अहमदनगर : जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत रविवारी १ हजार ६१७ रुग्णांची वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९ हजार ...

अहमदनगर : जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत रविवारी १ हजार ६१७ रुग्णांची वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९ हजार ३६८ इतकी झाली आहे. रविवारी १ हजार ३४७ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ९ हजारांच्या पार गेल्याने चिंता वाढली आहे. प्रशासनानेही सर्व कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) कार्यान्वित केले आहेत.

रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४५८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६१९ आणि अँटीजेन चाचणीत ५४० रुग्ण असे एकूण १६१७ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर २८५, अकोले ११, कर्जत २, कोपरगाव १, नगर ग्रामीण ३१, नेवासा ३, पारनेर १६, पाथर्डी ३, राहता २६, राहुरी ८, संगमनेर ४, शेवगाव ५, श्रीरामपूर २८, कॅंटोन्मेंट बोर्ड ३५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर १४१, अकोले २२, जामखेड ५, कर्जत ३, कोपरगाव ६२, नगर ग्रामीण १७, नेवासा १५, पारनेर ७, पाथर्डी ४, राहाता १२७, राहुरी २७, संगमनेर ९४, शेवगाव ०४, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ५३, कॅंटोन्मेंट बोर्ड ६, इतर जिल्हा १९ आणि इतर राज्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत रविवारी ५४० जण बाधित आढळून आले. नगर शहर ६५, अकोले ०६, जामखेड ०३, कर्जत ९२, कोपरगाव १४, नगर ग्रामीण ५०, नेवासा ३३, पारनेर ०८, पाथर्डी ४५, राहाता ३७, राहुरी ९१, शेवगाव १८, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट बोर्ड २० आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात रविवारी एकाचाही मृत्यू झाला नाही, असे आरोग्य यंत्रणेने सांगितले. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने सर्व कोविड केअर व डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या २८ ठिकाणी शासकीय कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून बाधित रुग्णांनी घरी न थांबण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

-------------------

बरे झालेली रुग्ण संख्या : ९१०४८

उपचार सुरू असलेले रूग्ण : ९३६८

मृत्यू : १२३८

एकूण रूग्ण संख्या : १,०१,६५४

--------------

अधिकाऱ्यांना मुख्यालयात थांबण्याचे आदेश

जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयात थांबावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यंत्रणेला दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. आपत्कालीन यंत्रणांना आवश्यकतेपेक्षा मदतनीस उपलब्ध करून देणे गरजेचे असणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन, समन्वय, अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश भोसले यांनी दिले आहेत. याची अंमलबजावणी तत्काळ लागू करण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी सांगितले.

----------------