शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दीडपट रकमेच्या आमिषाने ४८ लाखांची फसवणूक

By admin | Updated: April 30, 2017 15:42 IST

दीडपट परताव्याचे आमिष दाखवून शेवगावमधील सहा जणांना ४८ लाख ६१ हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना शेवगावमध्ये उघडकीस आली आहे़

आॅनलाइन लोकमतशेवगाव (अहमदनगर), दि़ ३० - दीडपट परताव्याचे आमिष दाखवून सहा जणांना ४८ लाख ६१ हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना शेवगावमध्ये उघडकीस आली आहे़ विशेष म्हणजे ज्या कंपनीत संबंधित लोकांना रक्कम गुंतविल्याचे सांगण्यात येत होते, ती कंपनीही बनावट असल्याचे उघड झाले आहे़ या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.श्रीकांत विठ्ठलराव काळे (रा. ब्राह्मणगल्ली, शेवगाव) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ या फिर्यादीनुसार श्रीराम कॉलनी भागातील एलआयसी विमा प्रतिनिधी असलेला दादासाहेब श्रीधर भुसारी व त्याची पत्नी माया तसेच सचिन श्रीधर भुसारी व त्याची पत्नी पूजा यांनी आपल्या भागीदारीतील डी. एस. भुसारी मल्टीसर्व्हिसेस अँड ट्रेडिंग कंपनी आणि स्वप्नपूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांत पैसे गुंतविल्यास दोन वर्षात दीडपट रक्कम मिळण्याचे आमिष परिसरातील लोकांना दाखवून १३ लाख १५ रुपये उकळले़ नोव्हेंबर २०१४ ते जून २०१६ या कालावधीत डी. एस. भुसारी मल्टिसर्व्हिसेस अँड ट्रेडिंग या कंपनीत एकूण ११ लाख रुपये, तसेच स्वप्नपूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत एकूण २ लाख १५ हजार रुपये गुंतविण्यास भाग पाडले़ या रकमा स्वीकारल्यापोटी संबंधितांना पोहोच पावत्याही देण्यात आल्या. यातील काही रकमांची दीड वर्षाची मुदत पूर्ण झाल्यामुळे दादासाहेब भुसारी व त्याचा भाऊ सचिन भुसारी यांच्याकडे काळे यांनी पैशाचा तगादा लावला. वेळोवेळी पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याने काळे यांनी व्यवहाराबाबत अधिक चौकशी केली असता यामध्ये आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, त्यानंतर श्रीकांत काळे यांनी दादासाहेब श्रीधर भुसारी व त्यांची पत्नी माया तसेच सचिन श्रीधर भुसारी व त्यांची पत्नी पूजा यांच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार या चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला.आरोपींनी शेवगाव येथील राजेंद्र चंपालाल मेहेर (४ लाख), शिवाजी गहिनीनाथ बडे (१४ लाख २० हजार), सुचेत गोकुळ भालसिंग (४ लाख ४६ हजार) व सामनगाव (ता.शेवगाव) येथील विनोद एकनाथ शेळके यांच्याकडून ९ लाख २५ हजार रुपये घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले़ या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांचे जबाब घेऊन सहाजणांची एकूण ४८ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल भुसारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे पुढील तपास करीत आहेत.