शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

३० टक्के पोलीस आजारी

By admin | Updated: August 19, 2014 23:31 IST

अहमदनगर : मुंबईमध्ये ३० टक्के पोलिसांना रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचे आजार आहेत. अशीच स्थिती जिल्ह्यातील पोलिसांचीही असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

अहमदनगर : मुंबईमध्ये ३० टक्के पोलिसांना रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचे आजार आहेत. अशीच स्थिती जिल्ह्यातील पोलिसांचीही असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे आजार एकदा जडले की ते कायमस्वरुपी राहतात. त्यामुळे पोलिसांनी शरीर सुदृढ ठेवण्यासाठी दररोज खेळासाठी ४५ मिनिटे द्यावीत, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी केले.जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धांचे मंगळवारी (दि.१९) सायंकाळी शानदार उद्घाटन झाले. खेळाडूंच्या विविध पथकांनी रंगीबेरंगी जॅकेट घालून सय्यद अन्वर यांच्या नेतृत्त्वाखाली शानदार संचलन केले. बाबा कोरेकर यांनी क्रीडा मशाल संचलित करून पोलीस अधीक्षक गौतम यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी मशालीद्वारे क्रीडाज्योत प्रज्वलीत केली. रंगीबेरंगी फुगे आणि कबुतरे आकाशात सोडून स्पर्धेचे उद्घाटन केले. प्रारंभी पोलीस बॅण्ड पथकाच्या देशभक्तीपर गीतांच्या साथीने खेळाडूंनी शानदार संचलन केले. क्रीडाज्योत प्रज्वलीत झाल्यानंतर स्पर्धा सुरू झाल्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रास्ताविक केले. पोलीस उपविभागीय अधिकारी वाय.डी. पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे, लक्ष्मण काळे, सीआयडीचे विवेक पाटील, राहुल पाटील यांच्यासह पाचही विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)