खासगी प्रवासी वाहनांची २५ टक्के दरवाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:26 IST2021-08-17T04:26:54+5:302021-08-17T04:26:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अलीकडच्या काळात पेट्रोल, डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांबरोबरच ...

25% hike in private passenger vehicles | खासगी प्रवासी वाहनांची २५ टक्के दरवाढ !

खासगी प्रवासी वाहनांची २५ टक्के दरवाढ !

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अलीकडच्या काळात पेट्रोल, डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांबरोबरच खासगी प्रवासी वाहनधारकांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात २० ते २५ टक्के भाडेवाढ करूनही वाहनावरील बँकांच्या कर्जाचे हप्ते भरणेदेखील कठीण झाले आहे.

जिल्ह्यात सार्वजनिक वाहतुकीबरोबरच खासगी वाहतूक करणारी साधने मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातून हजारो व्यक्तींना रोजगार मिळून त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. या व्यवसायात छोट्या- मोठ्या कार, जीप, टेम्पो ट्रॅव्हलर, क्रुझर, रिक्षा यासह इतरही वाहनांचा सर्वच स्तरातील नागरिक खासगी कामासाठी, पर्यटनासाठी, धार्मिक दर्शन, विवाहसोहळ्याबरोबरच विविध कामासाठी उपयोग करीत असतात. त्यातच कोरोना महामारीमुळे आधीच प्रवासावर मर्यादा आल्या आहेत. प्रवासी संख्याही घटली आहे. इधनाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे एकूणच सर्वच जुळवाजुळव करताना खासगी वाहन धारकांबरोबरच प्रवाशांची चांगलीच दमछाक होत आहे.

.......

असे वाढले पेट्रोल-डिझलेचे दर ( प्रति लिटर )

पेट्रोल डिझेल

जानेवारी २०१९ - ७६.६३ ६८.२५

जानेवारी २०२० - ७९ .०६ ६८.५७

जानेवारी २०२१ - ९२.९७ ८२.१५

ऑगस्ट २०२१ - १०७.६५ ९५.८०

.............

प्रवासी वाहनांचे प्रति कि.मी.दर

वाहनाचा प्रकार प्रति कि.मी. दर

अ ) छोटी कार - ११ ते १२ रुपये

ब ) क्रुझर - १८ ते २० रुपये

क) जीप - १४ ते १५ रुपये

ड ) टेम्पो ट्रॅव्हलर - २० ते २२ रुपये

.............

हप्ता कसा भरणार ?

“माझा खासगी प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे वाहनाच्या सर्वच प्रकारच्या स्पेअरपार्टच्या किमती, मजुरी वाढली आहे. आम्ही भाडेवाढ करूनही काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे आमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून प्रसंगी वाहनखरेदीसाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे देखील अवघड झाले आहे.

- मंजाहरी टेके, व्यावसायिक.

...........

“ इंधनाचे दर वाढल्याने त्यातून वाढलेली भाडेवाढ यामुळे प्रवाशांची संख्यादेखील घटली आहे. या व्यवसायात उत्पन्नापेक्षा खर्चाच्याच बाबी वाढल्या आहे. त्यामुळे जुळवाजुळव करतांना कसरत करावी लागत आहे.

- सागर करडे, व्यावसायिक.

................

स्टार १०५५

Web Title: 25% hike in private passenger vehicles