जिल्हा बँकेच्या १७ जागा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:20 IST2021-02-12T04:20:34+5:302021-02-12T04:20:34+5:30

कर्जत तालुक्यात अंबादास पिसाळ, मीनाक्षी सुरेश साळुंके यांच्यात तर नगर तालुक्यातील शिवाजीराव कर्डिले व सत्यभामाबाई भगवान बेरड यांच्यात लढत ...

17 District Bank seats unopposed | जिल्हा बँकेच्या १७ जागा बिनविरोध

जिल्हा बँकेच्या १७ जागा बिनविरोध

कर्जत तालुक्यात अंबादास पिसाळ, मीनाक्षी सुरेश साळुंके यांच्यात तर नगर तालुक्यातील शिवाजीराव कर्डिले व सत्यभामाबाई भगवान बेरड यांच्यात लढत होणार आहे. तसेच पारनेरमधून राष्ट्रवादीचे उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात सामना रंगणार आहे. याशिवाय बिगर शेती मतदारसंघात राष्ट्रवादीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड व दत्तात्रय पानसरे यांच्यात चुरस आहे.

....

महाविकास आघाडीत सेनेला एकच जागा

महाविकास आघाडीत मंत्री शंकरराव गडाख यांच्या रूपाने एक जागा मिळाली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन यांचा अर्ज मागे घेतला आहे. महाविकास आघाडीकडून भाजपला महत्त्व देण्यात आले आहे.

....

अध्यक्ष महाविकास आघाडीचाच - थोरात

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्हाचा मेळ घातला आहे. जिल्हा बँकेचा अध्यक्ष महाविकास आघाडीचाच होईल, असा दावा थोरात यांनी केला.

Web Title: 17 District Bank seats unopposed