शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांची पत्रे : सेवकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:22 IST

मनुष्य हा कुसंगतीमुळे धड मनुष्य राहिलेला नाही व धड जनावरही राहिलेला नाही. त्याची अजब अवस्था झालेली आहे. मनुष्य म्हणावा तर त्याला संस्कृती नाही नि धर्म नाही. समाजसेवा नाही, किंबहुना कुणाशी कसे वागावे याचे सुद्धा ज्ञान नाही.

प्रिय मित्र-मी ऐकले आहे की तुला प्रार्थना, भजन व व्यायामाचाही उत्तम नाद लागलेला आहे. अरे हे भाग्य सर्वच लोकांना लाभत नाही. मनुष्य हा कुसंगतीमुळे धड मनुष्य राहिलेला नाही व धड जनावरही राहिलेला नाही. त्याची अजब अवस्था झालेली आहे. मनुष्य म्हणावा तर त्याला संस्कृती नाही नि धर्म नाही. समाजसेवा नाही, किंबहुना कुणाशी कसे वागावे याचे सुद्धा ज्ञान नाही.म्हणे मी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे व सर्टिफिकेट मिळवले आहे. असेल तर ते सरकारी नोकरीकरिता! पण बाबा, चार लोकांत तुला काही स्थान? समाजाच्या सुखदु:खाची तुला काही जाणीव? भारताच्या काही साधुसंताचा तुला काही परिचय? काही धर्मग्रंथाचे वाचन? तुझ्या घरी तुझ्या संस्कृतीचे चिन्ह? राष्ट्रपुरुषांचे फोटो तरी? चार गरीब लोक तुझ्याजवळ येऊन प्रेमाने बोलतात तरी काय? व तू त्यांना मोकळ्या मनाने आपले तरी मानतोस काय? असे तर काहीच नाही. आपल्याच थाटात, आपल्याच तालात वय जाते. याला काय माणूस म्हणतात? समाजाने तुझा काय बरे धडा घ्यावा? असे आज-काल झाले आहे. तू मजूर असूनसुद्धा आपल्या पोटाचा धंदा करून सकाळ सायंकाळ ध्यान, सामुदायिक प्रार्थना व ग्रामाच्या सेवेत आपला वेळ देतोस आणि व्यायामाच्या सवयीने तुझ्या शरीराचा बांधा पोशाखशिवायही तू उत्तम ठेवलास ही फार मोठी गोष्ट आहे.मित्रा, कधीतरी तुम्हा लोकांची गरज देशाला असेल. आपण सर्व देशाचे संस्कृतीच्या यंत्राचे पुर्जे आहोत. जेव्हा देशात लढाई येईल तेव्हा आपण धडाडीने सैनिक होऊन भारताला विजयी केले पाहिजे. जेव्हा देशात अन्नधान्याचा तुटवडा पडेल तेव्हा शेतात राबून साथी सांगाती घेऊन धनधान्य वाढविण्याला मदत केली पाहिजे. रोगराई वाढेल तेव्हा घराघरात जाऊन बिमारांची सेवा केली पाहिजे. अशी अनेक समाजसेवेची कामे करून आपला जीव, देह सार्थकी लावला पाहिजे. हाच खऱ्या सेवकाचा बाणा आहे. मानवाचे कर्तव्य आहे.काही लोक मला मंत्र मागतात. मी त्यांना म्हणतो. ‘अहो जरा माणुसकीचे तंत्र तर अगोदर शिका. नंतर मंत्रवाल्या गुरुकडे जा. नाही तर बिचारा गुरुही बदनाम व तुम्हीही तसेच ठोंबे राहाल नाही! हे बघा, माझ्याजवळ हाच मंत्र आहे. समाजाच्या कामी पडा व आपले नाव लोकांच्या तोंडी उत्तम माणूस म्हणून आणा. मित्रा तुझे कार्य असेच वाढत राहो हीच माझी सदिच्छा!                                                                                                                                                        - तुकड्यादास

  • संकलन : बाबा मोहोड
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज